घरअर्थजगतLIC IPO Pan Link: LIC IPO साठी तुमच्या पॉलिसीबरोबर पॅन करा...

LIC IPO Pan Link: LIC IPO साठी तुमच्या पॉलिसीबरोबर पॅन करा अपडेट अन्यथा…

Subscribe

जर तुम्हीसुद्धा यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी असू शकते. कारण या IPO मधील LIC पॉलिसी होल्डर्ससाठी याचा 10 टक्के भाग राखीव असेल. म्हणजेच पॉलिसी होल्डर्सना यातील शेअर घेणे शक्य होणार आहे. या बरोबरच त्यांना डिस्काउंटसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्लीः रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रिटेल गुंतवणूकदार LIC च्या IPOची आतुरतेने वाट बघत आहेत, यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रंसुद्धा जमा केली गेलीत. जर तुम्हीसुद्धा LIC च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. LIC IPO मध्ये एक्सट्रा डिस्काउंट मिळवायचा असेल तर पटापट तुमच्या डिमॅट अकाऊंट आणि पॅनकार्डला लिंक करून घ्या. 28 फेब्रुवारी म्हणजेच आज याची शेवटची तारीख आहे.

जर तुम्हीसुद्धा यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी असू शकते. कारण या IPO मधील LIC पॉलिसी होल्डर्ससाठी याचा 10 टक्के भाग राखीव असेल. म्हणजेच पॉलिसी होल्डर्सना यातील शेअर घेणे शक्य होणार आहे. या बरोबरच त्यांना डिस्काउंटसुद्धा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

IPO मध्ये गुंतवणूक करण्याआधी ही तयारी करा

जर तुम्हीसुद्धा LIC IPOमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर त्याआधी काही कागदपत्रं तयार ठेवा. LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्याकडे LIC पॉलिसी खात्याशी जोडलेलं पॅनकार्ड आणि डिमॅट अकाऊंट लिंक असणं गरजेचं आहे.

10 टप्प्यांमध्ये करा पॅन डिटेल अपडेट

– यासाठी सगळ्यात आधी LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– आता होमपेज वर ‘Online PAN Registration’ निवडा.
– आता रजिस्ट्रेशन पेजवर ‘Proceed’ वर क्लिक करा.
– नव्या पेजवर पॅन, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॉलिसी नंबर बरोबर भरा.
– या नंतर कॅप्चा कोड सबमिट करा.
– आता ओटीपी रिक्वेस्टवर क्लिक करा.
– तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
– ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
– या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल.
– परत एकदा जन्मतारीख आणि पॉलिसी पॅन नंबर पडताळून पाहा.

- Advertisement -

पॉलिसी धारकांचा आणि कर्मचाऱ्यांचा भाग राखीव

LIC पॉलिसी धारकांचा आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांचा IPO मधील भाग राखीव असेल, असं कंपनीनं स्पष्ट केलंय. यात दोघांना LIC च्या इश्यूवर सूट दिली जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जमा केलेल्या कागदपत्रांच्या 10 टक्के भाग पॉलिसी धारकांसाठी राखीव असेल, यामध्ये LIC कर्मचाऱ्यांसाठी 5 टक्के भाग राखीव असेल.


हेही वाचाः भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -