घरदेश-विदेश...असे त्यागमूर्ती आता निर्माण होणार नाहीत, संजय राऊत यांचे भाजपावर शरसंधान

…असे त्यागमूर्ती आता निर्माण होणार नाहीत, संजय राऊत यांचे भाजपावर शरसंधान

Subscribe

मुंबई : गेल्या आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन नव्या वास्तूत झाले. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. आधीच्या संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले. गरीबाला श्रीमंतीची चटक लागली की, तो बेफाम होतो, पण श्रीमंती त्यागणाऱ्यांच्या हाती देश गेला की, तो भारतमातेच्या गळ्यातील ताईत ठरतो. गेल्या सत्तर वर्षांत असे अनेक त्यागमूर्ती या जुन्या संसदेने पाहिले. असे त्यागमूर्ती आता निर्माण होणार नाहीत, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून…, संजय राऊत यांची मोदी सरकारवर रोखठोक टीका

- Advertisement -

संसदेच्या जुन्या इमारतीच्या पायरीवर डोके ठेवून नरेंद्र मोदी यांनी खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. मोदी यांनी श्रद्धेने माथे टेकवले व हे सर्व ढोंग आहे असे तेव्हा वाटले नाही. मोदींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, ते त्या संसदेच्या पायरीवर पडले. तीच वास्तू मोदींना नकोशी झाली, असे सांगतानाच, जुन्या संसद भवनाचा निरोप घेताना मोदी म्हणतात, “रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला हीच हिंदुस्थानच्या लोकशाहीची ताकद आहे.” मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरातून केली आहे.

हेही वाचा – ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरबाबत अजित पवार म्हणाले; “जोपर्यंत 145ची मॅजिक फिगर…”

- Advertisement -

विशेष अधिवेशनादरम्यान, नव्या संसदेतील प्रेक्षक गॅलऱ्या यावेळी ठरवून गच्च भरवल्या गेल्या. महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना दिल्लीतील शाळांतील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांना बसेस भरून संसदेत आणले. या सर्व शाळा संघ परिवाराशी संबंधित होत्या हे नंतर समजले. नवे संसद भवन हे भाजपचे जणू मुख्यालय, प्रचार केंद्र बनले. प्रेक्षकगृहात जाणाऱ्या महिलांकडून ‘मोदी झिंदाबाद’चे नारे नव्या संसद भवनात देण्यात आले. हे यापूर्वी कधी घडले नाही. जुनी संसद हे सर्व हतबलतेने पाहत उभी आहे, पण बोलायचे कोणी? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -