घरदेश-विदेशउपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एकाचवेळी 15 पोलीस कर्मचारी गैरहजर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एकाचवेळी 15 पोलीस कर्मचारी गैरहजर

Subscribe

ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्स्पो मार्टमध्ये सुरु असलेल्या जल सप्ताह कार्यक्रमाचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमासाठी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते, मात्र यावेळी त्यांच्या पोलीस सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड कार्यक्रमास्थळी आले तेव्हा सुरक्षेसाठी तैनात 15 पोलीस कर्मचारी गैरहजर आढळले. (greater noida big lapse in security of vice president jagdeep dhankhar 15 policemen were absent)

ग्रेटर नोएडाचे डीसीपी अभिषेक वर्मा यांनी उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची चौकशी केली, या चौकशीत दोन पोलिस स्टेशन प्रभारी, आयटी सेलमध्ये तैनात एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक, महिला उपनिरीक्षक, सहा हेड कॉन्स्टेबल, आणि चार महिला कॉन्स्टेबल गैरहजर आढळल्या. हे सर्व पोलीस कर्मचारी उशिराने आपल्या कर्तव्यावर पोहोचले. या पोलिसांना कडक सूचना देऊन सर्वांच्या गैरहजेरीची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत ग्रेटर नोएडा पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. इंडिया एक्स्पो मार्टच्या आसपास मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ग्रेटर नोएडाचे डीसीपी अभिषेक वर्मा आणि अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे यांनी सुरक्षेवर लक्ष ठेवले. यादरम्यान डीसीपी अभिषेक वर्मा यांनी पोलिस दलाची पाहणी केली असता काही पोलिस वेळेवर ड्युटीवर पोहोचले नसल्याचे दिसून आले.

ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते जल सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी उपाध्यक्ष जगदीप धनखड उपस्थित होते. समारोप सोहळ्याला अनेक केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.

- Advertisement -

अमित शाहांच्या सुरक्षेतही झाला होता गलथानपणा

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाल्याचे उघड झाले होते. आंध्र प्रदेशातील एक तरुण खासदाराचा पीए असल्याची बतावणी करत अमित शाह यांच्या आसापस फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक करत 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. हेमंत पवार असे या आरोपीचे नाव असून तो धुळे जिल्ह्याचा होता.

मुंबई पाठोपाठ हैदराबादेतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. तेलंगणा मुक्ती दिनानिमित्त हैदराबादला पोहोचलेल्या अमित शाहांच्या ताफ्यासमोर अचानक टीआरएस नेत्याची गाडी समोर आली. यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी क्षणातच त्याची गाडी ताफ्याच्या समोरून हटवली.


बड्या व्यक्तींच्या गाड्यांना अपघात, सर्वसामान्यांचं काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -