Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Green Fungus: काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या बुरशीनंतर आढळला हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण; जाणून...

Green Fungus: काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या बुरशीनंतर आढळला हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण; जाणून घ्या लक्षणं

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले होते. मात्र आता बऱ्याच प्रमाणात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट होताना दिसतेय. हे दिलासादायक असलं तरी कोरोना व्हायरस मधून बरे झालेल्या रूग्णांना इतर आजार सतावत असल्याचे समोर येत आहे. कोरोनानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळ्या बुरशीने देशभरात कहर करण्यास सुरूवात केली आहे. मात्र आता एक नवी बुरशी आढळली असून ती हिरव्या रंगाची असून तिला ग्रीन फंगस असं देखील म्हटलं जात आहे. दरम्यान देशात या नव्या हिरव्या बुरशीच्या पहिल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये या नवीन बुरशीजन्य संसर्गाचे प्रकरण समोर आले आहे, ही देशातील पहिली घटना आहे. कोविडच्या रिकव्हरीनंतर काळी, पांढरी आणि पिवळी बुरशी असे आजार नोंदले गेले होते, परंतु आता इंदूरमध्ये अशी पहिलीच घटना घडली असून ज्यामध्ये रुग्ण ९० दिवसाच्या उपचारानंतर हिरव्या बुरशीचा पहिला बळी ठरला आहे.

फुफ्फुसांमध्ये आढळली हिरवी बुरशी

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यांपासून इंदूर रूग्णालयात रूग्णांवर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्या रूग्णाला शक्य तितके सर्व उपचार सुरू असताना देखील फुफ्फुसांचा ९० टक्के सहभाग नव्हता. यानंतर रुग्णालयाने रुग्णाच्या फुफ्फुसांची तपासणी केली असता असे दिसून आले की, रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये हिरव्या रंगाची बुरशी आढळली. मात्र हा आजार म्युकर मायकोसिस नव्हता, असे देखील सांगण्यात आले. या बुरशीच्या हिरव्या रंगामुळे त्याला ग्रीन फंगस असे नाव देण्यात आले आहे.

नेमकी कशी आहे हिरवी बुरशी?

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, एस्परजिलस बुरशीला सामान्य भाषेत हिरव्या बुरशी म्हणतात. एस्परजिलसचे बरेच प्रकार आहेत. हे शरीरावर काळ्या, निळ्या-हिरव्या, पिवळ्या-हिरव्या आणि तपकिरी रंगात दिसत आहे. एस्परजिलस बुरशीजन्य संसर्गाचा देखील फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये, फुफ्फुसांमध्ये पू निर्माण होणं, ज्यामुळे या आजाराचा धोका वाढतो. यामुळे ही बुरशी फुफ्फुसात वेगाने संक्रमित होऊ शकते.

असे आहेत हिरव्या बुरशीचे लक्षणे?

- Advertisement -