घरताज्या घडामोडीPathankot Attack: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला; पोलिसांकडून हायअलर्ट जारी

Pathankot Attack: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला; पोलिसांकडून हायअलर्ट जारी

Subscribe

पंजाबमधील (Punjab) पठानकोटमधील (Pathankot) धीरा पूलजवळील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर ग्रेनेड हल्ला झाला. माहितीनुसार बाईकस्वार अज्ञातांनी हे ग्रेनेड फेकले. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे बाईकस्वारांचा शोध सुरू आहे. अचानक झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पठाणकोट आणि पंजाबच्या सर्व पोलीस नाके हायअलर्ट ठेवण्यात आले आहेत. शिवाय पठाणकोट एअरफोर्स स्टेशन आणि इतर आर्मी कॅम्प भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

सुत्रांच्या माहितीनुसार या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रेनेडचे काही तुकडे घटनास्थळावरून जप्त केले. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा म्हणाले की, ‘इथे ग्रेनेट हल्ला झाल्याचे प्रथमदर्शीनी निदर्शनास आले. पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळावरून एक बाईक गेली आणि त्याचवेळेस हल्ला आहे. त्यामुळे सध्या आम्ही सर्व सीसीटीव्ही फुटेज घेत आहोत.’

जवळपास ६ वर्षांपूर्वी २ जानेवारी २०१६ साली पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये हवाई दलातील एका कमांडरसह ७ जवान शहीद झाले होते. सुरक्षेत सर्वात मोठी चुक झाल्याचे म्हटले जात होते. या हल्लानंतर सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये ५ हल्लेखोरांचा खात्मा केला होता. सर्व दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांचा पोशाख परिधान केला होता आणि एअरफोर्स स्टेशनच्या आतमध्ये घुसण्यात यशस्वी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – नौदलात शक्तिशाली ‘INS विशाखापट्टनम’ एंट्री; जाणून घ्या वैशिष्ट्ये


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -