मलाला आणि ग्रेटा यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात भेट; फोटो इंटरनेटवर व्हायरल

पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग आणि नोबल पुरस्कार विजेता मलाला युसूफ़जई या दोन तरुणींनी बुधवारी ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात भेट घेतली. मलाला ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून  या भेटीचा फोटो शेयर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

greta thunberg meets malala yousafzai at oxford university internet loves viral pic
मलाला आणि ग्रेटा यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात भेट; फोटो इंटरनेटवर व्हायरल
२२ वर्षीय मलाला आणि १७ वर्षीय ग्रेटा यांनी आज ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात एकमेकांची भेट घेतली. मलाला ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या भेटीचा फोटो शेयर केल्याच्या काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. या फोटोला मलालाने Thank you, @gretathunberg आणि हृदयाचा इमोजी असे कॅप्शन दिले आहे. इंस्टाग्रामवर या फोटोला आत्तापर्यंत सुमारे ३ लाख ७७ हजार लाईक्स मिळाले असून ५ हजारांच्यावर कमेंट्स केल्या आहेत. जगभरातून या भेटीला ‘ग्रेट भेट’ म्हणून या दोघींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मुख्य म्हणजे भारतीय अभिनेत्री प्रियंका चोपराने सुद्धा या फोटोला लाईक आणि कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

Thank you, @gretathunberg. ❤️

A post shared by Malala (@malala) on

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?

ग्लोबल वॉर्मिंगचा (तापमानवाढ) धोका लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी आंदोलन करणारी स्वीडनमधील सतरा वर्षीय शालेय विद्यार्थिनी आहे. बदलते हवामान आणि तापमानवाढ यांमुळे तरुण पिढीचे भविष्य धोकादायक आहे याची जाणीव ग्रेटाला झाली. आपल्या शाळेतूनच तिने आंदोलनाला सुरवात केली आणि काही काळातच हे आंदोलन जगभर पसरले. ग्रेटाच्या कार्याची दाखल घेत टाईम्स मॅगझिनने २०१९ साली ग्रेटाला ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केले. तेव्हा ती सोळा वर्षांची होती. ग्रेटा थनबर्गला २०१९-२०२० साली नोबल शांतता पुरस्कारासाठी नामांकनही देण्यात आले होते.

कोण आहे मलाला युसूफ़जई?

मलाला २२ वर्षीय सामाजिक कार्यकर्ता असून मुलींच्या शिक्षणासाठी अनेक कामे केली. मूळची पाकिस्तानची नागरिक असलेली मलालाला आपल्या शालेय जीवनात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. पाकिस्तानातल्या तालिबानी दहशतवाद्यांनी मुलीच्या शिक्षणावर बंदीचा फर्मान काढला होता. पण मलाला मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही होती. मात्र ९ ऑक्टोबर २०१२ साली तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोक्यात गोळी लागून ती गंभीररित्या जखमी झाली होती. उपचारासाठी तिला ब्रिटनमधील क्वीन एलिजाबेथ रुग्णालयात दाखल केले गेले. जगभरातून तिच्या कार्याची दखल घेऊन २०१४ साली नोबल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.