घरदेश-विदेशसहा किलोमीटर बर्षावर चालून त्याने केले लग्न

सहा किलोमीटर बर्षावर चालून त्याने केले लग्न

Subscribe

उत्तराखंड येथे हवामान बिघडले असल्यामुळे प्रंचड हिमवर्षा होते आहे. यामध्ये एक नवरदेव सहा किलोमीटर चालत जाऊन स्वतःच्या लग्नाला गेला.

थंड हवामान आणि प्रचंड हिमवर्षा अशा हवामानात कोणीही घराबाहेर पडू नये अशी चेतावनी सरकारकडून नागरिकांना दिली जाते. हवामानाचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून लोक आपापल्या घरातच राहणे योग्य समजतात. मात्र उत्तराखंड येथे एक तरुण या खराब हवामानामध्ये देखील सहा किलोमीटर बर्षावर चालून आपल्या लग्नाला गेला असल्याचे उघडकीस आले आहे. या नवरदेवाबरोबर अन्य २५ लोक उपस्थित होते. रुद्रप्रयाग येथील मक्कू मठ या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. या लग्नानंतर त्याने आपले फोटो शोशल मीडियावर टाकले आहे. लग्नासाठी चक्क सहा किलोमीटर पसरलेल्या बर्षावर चालून गेल्यामुळे लोकांनी या नवऱ्याचे अभिनंदन केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हिमवृष्टीतच केले लग्न

हे लग्न करणाऱ्या नवरदेवाचे नाव लक्ष्मण तर नवरीचे नाव सोनी आहे. उत्तराखंड येथे होत असलेल्या हिमवृष्टीनंतरही त्यांनी लग्न करायचे ठरवले होते. या निर्णयानंतर लक्ष्मणने आपल्या घरातून वरात नवरीच्या घराकडे नेली. हिमवृष्टी होत असल्याने या परिसरातील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प असल्याने या नवरदेवाची पायीच वरात काढण्यात आली. सहा किलोमीटर बर्षावर चालून ही वरात काढण्यात आली. सहा किलोमीटर चालूनही यांचा उत्साह कमी झाला नाही. त्यांनी लग्न पारंपारिक पद्धतीने केले. या लग्नाला त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -