घरअर्थजगतप्रत्यक्ष कर संकलनात ३० टक्क्यांनी वाढ, चालू आर्थिक वर्षात एक हजार कोटींचा...

प्रत्यक्ष कर संकलनात ३० टक्क्यांनी वाढ, चालू आर्थिक वर्षात एक हजार कोटींचा एकूण परतावा

Subscribe

नवी दिल्ली – प्रत्यक्ष कर संकलानात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. निव्वळ कर संकलन 7,00,669 कोटी (नेट ऑफ रिफंड) झाले असून करसंकलनात रु. 3,68,484 कोटी कॉर्पोरेशन कराचा(CIT) आणि रु. 3,30,490 कोटींच्या सिक्युरिटिज व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे.

हेही वाचा अचानक जमा झाले ११ हजार कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवताच बँकेने…

- Advertisement -

17 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीतून असे दिसून येत आहे की यंदा २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण, 2021-22 मध्ये सप्टेंबर महिन्यात 5,68,147 कोटींचे करसंकलन झाले होते. मात्र, यंदा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7,00,669 कोटी करसंकलन झाले आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्यक्ष करांचे (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) सकल संकलन आर्थिक वर्ष 2021-22 मधील 6,42,287 कोटींच्या तुलनेत 8,36,225 कोटी झाले आहे. 2021-22 च्या करसंकलनाच्या तुलनेत करसंकलनात 30% वाढ झाली आहे.

- Advertisement -

8,36,225 कोटीच्या सकल संकलनात 4,36,020 कोटींच्या कॉर्पोरेशन कराचा (CIT) आणि 3,98,440 कोटी सिक्युरिटीज व्यवहार करासह (STT) वैयक्तिक प्राप्तिकराचा(PIT) समावेश आहे.

हेही वाचा – 155.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींनाही टाकले मागे

किरकोळ शीर्षक निहाय संकलनामध्ये 2,95,308 कोटी अग्रिम कर संकलन, उद्गम कर 4,34,740 कोटी, रु.77,164 कोटी स्व-मूल्यांकन कर, नियमित मूल्यांकन कर 20,080 कोटी आणि 8933 कोटी रुपये इतर किरकोळ शीर्षकाखालील कर समाविष्ट आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत 17 सप्टेंबर 2022 पर्यंत अग्रिम  कर संकलन 2,95,308 कोटी रुपये झाले असून मागील वर्षाच्या याच कालावधीतील 2,52,077 कोटी रुपये आगाऊ कर संकलनाच्या तुलनेत 17% पेक्षा जास्त आहे. यामध्ये 2,29,132 कोटी कॉर्पोरेशन कर (CIT) आणि रु.66176 कोटी वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) समाविष्ट आहे.

चालू आर्थिक वर्षात दाखल झालेल्या प्राप्तिकर विवरणपत्रांच्या निपटारा प्रक्रियेच्या गतीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. 17-9-2022 पर्यंत जवळपास 93% विवरणपत्रांची पडताळणी करून निपटारा झाला आहे. यामुळे परतावे देण्याच्या वेगात मोठी वाढ झाली आहे आणि चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या परताव्यांच्या संख्येत सुमारे 468% वाढीची नोंद झाली आहे. आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये 17 सप्टेंबर 2022 पर्यंत  1,35,556 कोटींचे परतावे देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच काळापर्यंत देण्यात आलेल्या 74,120 कोटींच्या तुलनेत 83% वाढीची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -