घरताज्या घडामोडीGroup Captain Varun Singh Health Updates: ग्रुप कॅप्टन वरूण सिंहांना बंगळुरूला केले...

Group Captain Varun Singh Health Updates: ग्रुप कॅप्टन वरूण सिंहांना बंगळुरूला केले एअरलिफ्ट

Subscribe

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर क्रॅशमधील एकमेव बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्या तब्येतीशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे. हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जीव गमावणाऱ्या सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचे पार्थिव शरीर आज दिल्ली येथे दाखल होईल. पण दुर्घटनेत बचावलेले एकमेव वरूण सिंह यांच्यावर वेलिंगटन येथील रूग्णालयात दाखल आहेत. सध्या ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहोत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. वरूण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांना बंगळुरू येथे एअरलिफ्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज सकाळीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरूण सिंह यांच्याबाबतचे अपडेट दिले होते. ते लाईफ सपोर्टवर असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. वरूण सिंह यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा या अपघातातील आगीत भाजल्याने झाल्या आहेत. त्यांचे वडिल कर्नल केपी सिंह (निवृत्त) यांनी सांगितले होती की वरूणला बंगळुरूला शिफ्ट करण्यात येऊ शकते. त्यानुसार वरूणला एअरलिफ्ट करण्यात आले आहे. (Group Captain Varun Singh airlifted to bengaluru as critical health on life support)

IAF Helicopter Crash : हेलिकॉप्टर अपघातातून १४ जणांपैकी फक्त शौर्यचक्र विजेते कॅप्टन वरुण सिंग बचावले ; रुग्णालयात उपचार सुरू

- Advertisement -

याआधी ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्या तब्येतीशी संबंधित एक अपडेट न्यूज एजन्सी एनएनआयने दिले होते. त्यानुसार वरूण सिंह यांची तब्येत अत्यंत नाजुक असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच गरज पडल्यास वरूण सिंह यांना वेलिंगटन हॉस्पिटल येथून बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येईल, असाही अंदाज वर्तवण्यात येत होता. ग्रुप कॅप्टन वरूण सिंह हे प्रतिष्ठेच्या अशा डीएसएससी येथे संचालक आहेत. सुलूर एअर बेसच्या ठिकाणी त्यांनी जनरल रावत यांचे स्वागत केले, त्यानंतर वेलिंगटनसाठी ते रवाना झाले होते.

ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्यासाठी लोकांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कू एपवर लिहिताना म्हटले आहे की, बुधवारी झालेल्या हेलिकॉप्रटर दुर्घटनेत मॉं भारती यांचे सुपूत्र आणि जनपद देवरियाचे निवासी, शौर्य चक्राने सन्मानित ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्या साहसाला नमन. प्रभु श्री राम यांना वरूण सिंह यांच्या आरोग्यात सुधारणेसाठी मी प्रार्थना करतो.

- Advertisement -

राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेबाबत माहिती देताना म्हणाले की, ८ डिसेंबर २०२१ च्या दुपारी सैन्याच्या हेलीकॉप्टरचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये देशाचे पहिले तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. जनरल बिपीन रावत वेलिंग्टनमधील सैनिकी शाळेच्या कार्यक्रमासाठी जात होते. ११.४८ वाजता त्यांनी सुलूर ऐअरबेसवरुन उड्डाण घेतले. १२.१५ मिनिटांनी वेलिंग्टनमध्ये पोहोचायचे होते. १२.८ मिनिटांनी सुलूर एअरबेसचा हेलीकॉप्टरशी संपर्क तुटला. यानंतर कुन्नूरमध्ये काही लोकांनी जंगलात सैन्य दलाचे हेलीकॉप्टर जळताना पाहिले त्यामुळे लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बचावकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जखमींना सैनिकी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

या हेलीकॉप्टरमध्ये १४ लोक प्रवास करत होते. परंतु त्यांमधील १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यांममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा, हवालदार सत्पाल, ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे.


कुन्नूर हेलीकॉप्टर दुर्घटनेवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे संसदेत निवेदन

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -