घरदेश-विदेशरघुराम राजन यांच्या धोरणामुळे मंदी आली - निती आयोग

रघुराम राजन यांच्या धोरणामुळे मंदी आली – निती आयोग

Subscribe

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणांमुळेच देशात मंदी आली असल्याचा दावा नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे.

देशातील मंदीला रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन जबाबदार असल्याचे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले आहे. रघुराम राजन यांच्या धोरणामुळे गेल्या तीन वर्षात मंदी आली आणि जीडीपीच्या दरात मोठी घसरण झाली. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पहिल्या ३ तिमाहिचा विकास दर नुकताच जाहीर झाला. गेल्या तीन वर्षातील आर्थिक विकास दरापेक्षा यंदा नोंदवण्यात आलेला विकास दर सर्वाधिक असल्याचा दावा सरकारने केला आहे. बँकिंग क्षेत्रात वाढणारा एनपीए हा देखील विकास दर घटण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

जीडीपीमध्ये साततत्याने घसरण झाली

गेल्या तीन वर्षात बँकांमध्ये थकीत कर्ज वाढत गेल्याने आर्थिक विकास दरात घसरण झाली. मोदी सरकारने सत्ता हातात घेतली तेव्हा बँकांमधील थकीत कर्ज 4 लाख कोटी रुपये होते. २०१७ मध्ये हाच आकडा १०.५ लाख कोटींवर गेला. त्याचा परिणाम म्हणजे छोट्या आणि मध्यम उद्योगांना बँकांनी कर्ज देणे कमी केले. त्यामुळे या क्षेत्रात नकारात्मक विकास पहायला मिळाला. थकीत कर्जामध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्या तीन वर्षात जीडीपीमध्ये सातत्याने घसरण झाली आणि यासाठी फक्त रघुराम राजन हेच जबाबदार आहेत’, असा आरोप राजीव कुमार यांनी केला.

विकास दर घसरणीला नोटबंदी जबाबदार नाही

नोटबंदीमुळे विकास दर घटल्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत त्या चूकीच्या असल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले आहे. जर तुम्ही विकास दराची आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, नोटबंदीनंतर जो जीडीपी दर कमी पहायला मिळाला त्याचे कारण नोटबंदी नाही. तर गेल्या सहा तिमाहिपासून अर्थव्यवस्थेमध्ये लागोपाठ येणाऱ्या मंदीमुळे विकासदर कमी होत होता. असा कोणताही पुरावा नाही की आर्थिक मंदी नोटबंदीमुळे आली आहे, असे राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राजन यांच्यामुळे नोकऱ्या गायब झाल्या

बँकांमधील थकीत कर्जाचे आकालन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नवी पध्दत सुरु केली. त्यामुळे बँकेतील थकीत कर्जात वाढत होत गेली. त्यामुळे बँकांचा कंपन्यांवरील विश्वास उडाला. यामुळे देशातील कंपन्यांना बँकांकडून नव्याने कर्ज मिळाले नाही आणि आर्थिक मंदी आली असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -