घरअर्थजगतदही-लस्सीसह स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटी वाढणार, महागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

दही-लस्सीसह स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटी वाढणार, महागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

Subscribe

याआधी ज्या वस्तू जीएसटी (GST) कक्षात नव्हत्या त्यावर आता जीएसटी लागू करण्यात येणार आहे. तर, काही वस्तूंवरील जीएसटीत वाढ (Increase in GST) करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना १८ जुलैपासून विचारपूर्वक खर्च करावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईने (Inflation) उच्चांक गाठलेला असताना आता सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण याआधी ज्या वस्तू जीएसटी (GST) कक्षात नव्हत्या त्यावर आता जीएसटी लागू करण्यात येणार आहे. तर, काही वस्तूंवरील जीएसटीत वाढ (Increase in GST) करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना १८ जुलैपासून विचारपूर्वक खर्च करावा लागणार आहे. (GST on curd lassi other items from july 18, see full list of goods)

हेही वाचा – व्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

- Advertisement -

नुकतीच जीएसटी कॉन्सिलची (GST Counsil) ४७ वी बैठक पार पडली. या बैठकीत दैनंदिन वापरांच्या वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर काही वस्तूंवरील जीएसटीत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये दही, लस्सी, बटर आदी टेट्रापॅक वस्तूंना जीएसटी कक्षात आणले असून चेकबूक, एलईडी दिवे, ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल, शार्पनर आदी स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटीत वाढवण्यात आला आहे.

कोणत्या वस्तूंवर नव्याने जीएसटी लागणार?

- Advertisement -
  • टेट्रापॅक असलेले दही, लस्सी, बटर मिल्कसारख्या वस्तूंवर याआधी जीएसटी नव्हता. मात्र, आता त्यावर १८ जुलैपासून ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
  • नव्या नियमानुसार चेकबूकही महागणार आहे. कारण, चेकबूकवर बँकेकडून जे शुल्क आकारले जाते, त्यावर आता १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
  • रुग्णालयातील उपचारही महागणार असून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेल्या नॉन आयसीयू रुमसाठी आता ५ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
  • हॉटेलमध्ये राहणंही आता महाग होणार आहे. कारण एक हजार रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल्सच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. यापूर्वी यावर जीएसटी आकारला जायचा नाही.

हेही वाचा – साहेबराव देशमुख आणि सांगली सहकारी बँकांवर आरबीआयचे निर्बंध

कोणत्या वस्तूंवरील जीएसटीत होणार वाढ?

  • एलईडी दिव्यांवर याआधी १२ टक्के जीएसटी आकारला जायचा. मात्र आता १८ जुलैपासून १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
  • स्टेशनरी वस्तूही आता महाग होणार आहेत. ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर्स आणि केक सर्व्हर इत्यांदीवर आतापर्यंत १२ टक्के जीएसटी होता. मात्र, आता १८ जुलैपासून यावर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

हेही वाचा – जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा

या वस्तू आणि सेवांवरील जीएसटीत होणार कपात

  • रोपवे प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीच्या सेवेत आतापर्यंत १८ टक्के जीएसटी होता. तो कमी करून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे पर्यटन थोड्याफार प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता आहे.
  • अनेक वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही कमी करण्यात येणार आहे. स्प्लिंट्स, फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसेस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्रा-ऑक्युलर लेन्स यांवरील १२ टक्के जीएसटी कमी करून ५ टक्के करण्यात आली आहे.
  • मालवाहतुकीच्या भाड्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, संरक्षण दलासाठी आयात केलेल्या वस्तू आता जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, १८ जुलैपासून आयात वस्तूंवर जीएसटी लागू होणार नाही.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -