सोमवारपासून ‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार वाढ; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

मागील काही दिवसांपासून जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. अशातच आता आणखी आर्थिक समस्यांचा सामना सर्वसामन्यांना करावा लागणार आहे. उद्यापासून (सोमवार) 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत.

gst,Goods and Services Tax
प्रातिनिधिक छायाचित्र

मागील काही दिवसांपासून जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. अशातच आता आणखी आर्थिक समस्यांचा सामना सर्वसामन्यांना करावा लागणार आहे. उद्यापासून (सोमवार) 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे. नव्या जीएसटी दरानुसार, खाण्या-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. (gst rate hike on milk rice curd wheat healthcare system from monday 18 th july 2022)

अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार असून, धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे समजते. तसेच, पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, टेट्रा पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते.

बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे.

1 हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर केली आहे.

सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.

रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टीही महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे,. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.


हेही वाचा – दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये आपचा धडाका, ५१ लाख कुटुंबांना मिळणार मोफत वीज