घरCORONA UPDATELockdown- काळजी नको! आता 'या' तारखेपर्यंत भरा जीएसटी!

Lockdown- काळजी नको! आता ‘या’ तारखेपर्यंत भरा जीएसटी!

Subscribe

व्यापार बंद झाल्यामुळे व्यावसायिकांना डिजिटल स्वाक्षरी मिळू शकली नाहीत. त्यामुळेच सरकारने सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही ठप्प झाली आहे. या काळात केंद्र सरकारने २०१८- १९ या वर्षातील जीएसटी रिटर्न करण्याच्या अंतीम तारखेत तीन महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता सप्टेंबरपर्यंत जीएसटी भरता येणार आहे.

त्याचबरोबर सरकारने उद्योग, व्यापाराशी संबंधीत आणखी निर्णय घेतला आहे. व्यवसायिकांना जीएसटी रिटर्न फायलिंग आणि कर इलेक्ट्रॉनिक वेरीफिकेशन कोडच्या मार्फत तपासणीची परवानगी देण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत याची मुदत वाढ देण्यात आली आहे. डिजिटल स्वाक्षरीची गरज, मासिक जीएसटी रिटर्न भरणे आणि कर भरण्यास होणारा उशीर पाहता सरकारने व्यापाऱ्यांना ईव्हीसीद्वारे जीएसटी रिटर्न भरण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने एक ट्विट करून माहिती दिली आहे की, आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) चा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

ईवायवायचे अभिषेक जैन म्हणाले, “देशातील बहुतांश भाग पूर्ण लॉकडाउनमध्ये किंवा अंशतः लॉकडाउनमध्ये आहे.  त्यामुळे व्यवसायिकांना जून अखेरपर्यंत जीएसटी भरणे कठीण जाईल. अशा परिस्थितीत सीबीआयसीच्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

व्यापाऱ्यांना मासिक जीएसटी रिटर्न भरण्यासाठी आणि कर भरण्यासाठी जीएसटीआर -३ बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. मात्र,  व्यापार बंद झाल्यामुळे व्यावसायिकांना डिजिटल स्वाक्षरी मिळू शकली नाहीत. त्यामुळेच सरकारने सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.


हे ही वाचा – Coronavirus – ‘लवकरच महायुद्ध होणार…’ अभिनेत्याचं वादग्रस्त ट्वीट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -