घरदेश-विदेशगुजरातच्या विद्यार्थ्यांचे 'इंग्लिश' कच्चे

गुजरातच्या विद्यार्थ्यांचे ‘इंग्लिश’ कच्चे

Subscribe

व्यापार आणि उद्योगात अग्रेसर असणाऱ्या गुजरात राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीत विषयात मात्र बोंब असल्याचे यंदाच्या परीक्षेनंतर निदर्शनास आले आहे. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परिक्षेत बसलेल्या तब्बल २३० विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या कॉपी केल्याचे उघडकीस आले आहे. ही कॉपी त्यांही इंग्रजीसह संस्कृत आणि राष्ट्रीय भाषा हिंदीतही केला आहे.

स्वःतचे नावही लिहिता येईना…

दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘friend’, ‘clever’, ‘fondly’, ‘tennis’ सारखे इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगही लिहिता आले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना स्वतःचे नावही इंग्रजीत लिहिण्याचे वांदे असल्याचे दिसून आले. संस्कृतच्या पेपरमध्येही संस्कृत श्लोक गुजरातीमध्ये भाषांतर करणे विद्यार्थ्यांना जमले नसून त्यांनी एकमेकांची कॉपी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळाले. हा संपूर्ण प्रकार परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला आहे.

- Advertisement -

हिंदी आणि संस्कृतचे पेपर ‘सेम’

पंचमहल जिल्ह्यातील २३० पैकी ९६ प्रकरण ही शेहरा तालुक्यातील कवळी येथील परीक्षा केंद्रावरील आहेत. तर उर्वरीत १३० प्रकरण ही मोरवा रेना येथील परीक्षा केंद्रातील आहेत. या केंद्रातील विद्यार्थ्यांची हिंदी आणि संस्कृतच्या पेपरमधील उत्तरं एकसारखी असल्याचे पेपरतपासणीत आढळले आहे.

  • सीसीटीव्ही फुटेजमुळे कॉपीचे प्रकरण उघडकीस
  • फुटेजमध्ये वारंवार येत होते अडथळे
  • बोर्डाकडे सोपवलेल्या सीसीटीव्ही फुटेशी छेडछाड झाल्याचा संशय
  • परीक्षा केंद्र प्रमुखाने वीज कनेक्शन खराब असल्याचे दिले कारण
  • गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्डाशी संपर्क केल्यास परीक्षा केंद्र प्रमुख दिशाभूल करत असल्याचे झाले उघड
  • कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाईचे गुजरात बोर्डचे आदेश
Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -