गुजरातच्या अरवलीमध्ये पायी जाणाऱ्यांना कारने चिरडले; 6 जण ठार, 7 जखमी

gujarat 6 people dead and seven injured in road mishap

गुजरात : गुजरातच्या अरवली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात झाला आहे. येथे एका भरधाव कारने पायी जाणाऱ्या काही भाविकांना धडक देत चिरले आहे. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. (gujarat 6 people dead and seven injured in road mishap)

अरवली कृष्णापूरजवळ हा अपघात झाला आहे. अपघातनंतर जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातातील मृत व्यक्तींची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघातातील बहुतांश प्रवासी हे पंचमहाल जिल्ह्यातील काकोळ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रवासी अंबाजी मंदिरात दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. यावेळी एका भरधाव काराने या लोकांना चिरडल्याची घटना घडली, हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे. पण, ती कोणाची आहे, याबाबत अद्याप कुठलाही माहिती नाही. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले अंबानींच्या निवासस्थानी ‘श्रीं’चे दर्शन