घरदेश-विदेशगुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय; भूपेंद्र पटेल 12 डिसेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय; भूपेंद्र पटेल 12 डिसेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Subscribe

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत गुजरात विधानसभा निवजणुकीत भाजपला घवघवीत यश मिळला आहे. भाजप 150 हून अधिक जागा जिंकताना दिसत आहे. त्यामुळे आता गुजरात विधानसभेवर भाजप प्रचंड बहुमताने सत्ता काबीज करेल हे चित्र स्पष्ट आहे. गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहे. 12 डिसेंबरला त्यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. पटेल यांचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी आता भाजपने जय्यत तयारी केली आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपने अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. (Gujarat Assembly Election 2022 bhupendra patel will take oath as cm of gujarat for second time on december 12)

दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर आज संध्याकाळी ६.०० वाजता पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी पक्षाला मिळत असलेल्या दणदणीत विजयात आज मिठाई खाऊन आनंद साजरा केला. घटलोडिया मतदार संघ ही गुजरातची व्हीआयपी सीट आहे. याच मतदार संघात मुख्यमंत्री पटेल 1,07,960 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. 2017 च्या निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांनी या जागेवर 17 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. यंदाही भाजपाचाच चेहरा प्रभावी ठरला आहे.

- Advertisement -


गुजरातमध्ये भाजपाने विक्रमी विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष आणि जलसा साजरा करण्यात येतोय. दरम्यान गुजरातमध्ये 1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजप वळगता कोणत्याही पक्षाला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. यापूर्वी काँग्रेसने 1985 मध्ये 149 जागा जिंकल्या होत्या.

या निवडणुकीतील निकालावर आता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, गुजरातचे निकाल स्पष्ट आहेत. ही निवडणुक गुजराती लोक लढवत आहेत. असे पीएम मोदींनी आधीच सांगितले होते. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करु असा संकल्प आम्ही केला होता, त्यानुसार रात्रंदिवस आम्ही मेहनत घेत भाजपला विजय मिळवून देणाऱ्या गुजरातच्या जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी आभार मानतो.


महाराष्ट्रात आता तरी निवडणुका लावा; आदित्य ठाकरेंची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -