गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार? दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

गुजरात विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Gujarat Assembly elections Election Commission press conference schedule of the Gujarat Assembly elections)

गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे हा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका घेऊन निकाल घोषित केले जाण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेत 182 सदस्य आहेत. त्यानुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस किंवा डिसेंबरमध्ये मतदान होऊ शकते. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातात.

दरम्यान, गुजरातपूर्वी निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 8 डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या उमेदवारांची यादी जाहीर

आम आदमी पक्षाने (आप) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आपने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 100हून अधिक उमेदवारांची घोषणा करणारा आप हा एकमेव राजकीय पक्ष आहे.


हेही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, भाजपाच्या माघारीनंतर ७ उमेदवार रिंगणात