घरताज्या घडामोडीदाऊदचा निकटवर्तीय अब्दुल माजिदला अटक, २४ वर्ष होता फरार

दाऊदचा निकटवर्तीय अब्दुल माजिदला अटक, २४ वर्ष होता फरार

Subscribe

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मोठं यश मिळालं आहे. गुजरातच्या एटीएसनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय अब्दुल माजिद कुट्टीला अटक केली आहे. अब्दुल माजिदला झारखंड येथून अटक केली आहे. अब्दुल माजिद २४ वर्षांपासून फरार होता. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, १९९६ सालापासून माजिदचा तपास सुरू होता. तो केरळचा रहिवाशी आहे.

एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९६मध्ये १०६ पिस्तुल, सुमारे ७५० काडतुसे आणि चार किलो आरडीएक्स पाठविण्यात आले होते. याप्रकरणात अब्दुल माजिद सामिल होता. आधिकाऱ्यांच्या मते, याप्रकरणात इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. अब्दुल माजिद तेव्हापासून फरार झाला होता. दाऊद इब्राहिम निटकवर्तीय अब्दुल माजिदच्या अटक करणे हे गुजरात एटीएसची एक मोठी कामगिरी मानली जात आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, अब्दुल माजिद ओळख बदलून अनेक वर्ष झारखंडमध्ये राहत होता. तपासादरम्यान गुजरात पोलिसांना या संदर्भात एक सुगावा लागला होता, परंतु ठाम माहिती नसल्यामुळे तो अटकेपासून वाचत होता. दरम्यान गुजरात पोलिस १९९६ मध्ये शस्त्र पुरवठा संबंधित या प्रकरणाचा तपास करत होते.


हेही वाचा – कोरोना पॉझिटिव्ह सांताने दिले गिफ्ट; १५७ जण संक्रमित, १८ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -