Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश गुजरातमधील भरूच येथील केमिकल कंपनीत स्फोट; २४ जण जखमी

गुजरातमधील भरूच येथील केमिकल कंपनीत स्फोट; २४ जण जखमी

गुजरात येथील झगडियामध्ये असणाऱ्या केमिकल कंपनी यूपीएल -५ च्या प्लांटमध्ये स्फोट

Related Story

- Advertisement -

मंगळवारी पहाटे गुजरातच्या भरुच जिल्ह्यात मोठा अपघात झाला. गुजरात येथील झगडियामध्ये असणाऱ्या केमिकल कंपनी यूपीएल -५ च्या प्लांटमध्ये स्फोट झाला. या झालेल्या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत २४ कर्मचारी जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे दोन वाजता स्फोट होऊन आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचं रौद्र रूप लक्षात येताच अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून प्रयत्न सुरू होते. कंपनीच्या सीएम प्लांटमध्ये हा अपघात झाला. हा स्फोट इतका भीषण होता की १५ किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात भूकंप झाल्यासारखे हादरे बसले.

यूपीएल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर आगीत सुमारे २४ कर्मचारी जखमी झाले. त्यांना भरुच आणि वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, यूपीएल कंपनीच्या आसपास असलेल्या दाधेरा, फुलवाडी आणि कारलसाडी या गावात झालेल्या स्फोटांनी घरांच्या काचेच्या खिडक्या देखील तुटल्या असल्याचे ही सांगितले जात आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दलाची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच आरोग्य व जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारीही उपस्थित होते.

- Advertisement -

जूनमध्ये गेल्या वर्षात देखील भरुचमधील एका केमिकल कारखान्यात स्फोट झाला होता. स्टोरेज टाकीमध्ये हा स्फोट झाला असून पटेल ग्रुपच्या या केमिकल कंपनीतील भीषण स्फोटामुळे १० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृतदेह घटनास्थळी आढळला होता, तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. असे एकूण ७७ लोक जखमी झाले होते.


आली महागाई! रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ

- Advertisement -