फोटो : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये पंतगोत्सवाचा लुटला आनंद

गुजरातमधील अहमदाबादमध्ये उत्तरायण सण उत्साहात साजरा करण्यात आला. या काळात आयोजित कार्यक्रमांमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही सहभाग घेतला. ऐन उत्तरायण निमित्त नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर आणि मैदानावर एकत्र येऊन पतंगबाजीचा आनंद लुटला. यावेळी आकाशात रंगीबेरंगी पतंग फडकताना दिसत होते.