घरCORONA UPDATEमुंबईपाठोपाठ गुजरातमध्ये आढळला XE व्हेरिएंटचा रुग्ण, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य तज्ज्ञांचा...

मुंबईपाठोपाठ गुजरातमध्ये आढळला XE व्हेरिएंटचा रुग्ण, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

Subscribe

ओमिक्रॉनतच्या बीए १ आणि बीए २ व्हेरियंटमध्ये बदल होऊन तयार झालेल्या एक्सई हा विषाणू जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, ब्रिटनमध्ये सर्व प्रथम एक्सई हा व्हेरियंट आढळून आला. यानंतर जगभरातील अनेक देशामध्ये या व्हेरियंटचे सहाशेहून अधिक रुग्ण आढळून आलेत. दरम्यान मुंबईत देखील या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला आहे. अशात गुजरातमध्ये देखील या व्हेरिएंटने हात पाय पसरले आहेत. मुंबईपाठोपाठ गुजरातमध्ये या व्हेरिएंटच्या प्रत्येक एक एक रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा आता अधिक सतर्क झाल्या आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळून आलेल्या व्हेरियंटपेक्षा XE हा सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे, मात्र या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गुजरातमध्ये 13 मार्च रोजी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. पण तो व्यक्ती एक आठवड्यात ठीक देखील झाला. परंतु जेव्हा त्यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट समोर आले तेव्हा या व्यक्तीमध्ये XE व्हेरिएंट आढळून आला आहे. परंतु हा व्हेरिएंट वेगाने पसरणारा असल्याचे म्हटले जातेय. BA.2 व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट 10 टक्के वेगाने पसरतोय.

- Advertisement -

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक्सई हा ओमिक्रॉन या व्हेरियंटाचाच सब व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या ‘बीए-१’ आणि ‘बीए-२’ यांच्या मिश्रणातून तयार झालाय. देशात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनमुळे आली तर या व्हेरियंटमुळे नवीन कोणताही लाट येऊ शकत नाही. प्रत्येक विषाणूंमध्ये नैसर्गिक प्रक्रियेनुसार जनुकीय बदल होत असतात. त्यामुळे ‘एक्सई’ हा देखील त्याच प्रक्रियेचा भाग आहे. परंतु या व्हेरिएंटमुळे रुग्णात कोणतेही लक्षणं आढळत नाही त्यामुळे सरकारने चिंता न करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान भविष्यातही कोरोनाचे नवे व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. मात्र लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. त्यामुळे आजाराची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता फक्त खबरदारी घ्यावी असे आवाहन कोरोना टास्क फोर्सकडून केले जातेय.


मुंबईत कोविड 19 XE व्हेरिएंटचा रुग्ण नाहीच, महापालिकेचा दावा केंद्रानं फेटाळला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -