घरदेश-विदेशगुजरातमध्ये CRPF जवानाने सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू, दोन जखमी

गुजरातमध्ये CRPF जवानाने सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू, दोन जखमी

Subscribe

गुजरातमधील पोरबंदरजवळील एका गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने काही कारणावरून आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. यामध्ये दोन जवाव शहीद झाले असून दोन जखमी झाले आहेत. शनिवारी (26 नोव्हेंबर) रोजी संध्याकाळी ही घटना घडली. हे सर्व जवान मणिपूर सीआरपीएफ बटालियनचे आहेत. पुढील महिन्यात होत असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या जवानांना सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात केले होते. अशी माहिती पोरबंदरचे डीएम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ए.एम.शर्मा यांनी दिली आहे. पोरबंदर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. (Gujarat election 2022 2 CRPF jawans killed two others injured in firing by colleague during poll duty in Porbandar)

डीएम.ए.एम शर्मा यांच्या माहितीनुसार, सीआरपीएफचे जवान पोरबंदरपासून सुमारे 25 किमी अंतरावरील तुकडा गोसा गावातील एका केंद्रावर थांबले होते. यावेळी शनिवारी संध्याकाळी एका जवानाचे काही कारणावरून आपल्या सहकाऱ्यांसोबत वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात असॉल्ट रायफलने त्यांच्यावर गोळीबार केला.

- Advertisement -

या घटनेत दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जवान जखमी झाले आहेत. या दोन जखमी जवानांना तात्काळ उपचारांसाठी जामनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाच्या पोटावर आणि दुसऱ्या जवानाच्या पायाला गोळी लागली आहे अशीही शर्मा यांनी दिली आहे. नेमक कशावरून त्यांच्यात वाद झाला आणि हा गोळीबार का करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत.

येत्या 1 डिसेंबरला पोरबंदर जिल्ह्यात गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्याप्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोरबंदरपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या तुकडा गोसा गावातील चक्रीवादळ केंद्रात सीआरपीएफ जवानांची एक तुकडी थांबली होती. या केंद्राचा वापर सीआरपीएफ जवानांसाठी निवारा म्हणून केला जात आहे.


मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडताना ‘हे’ वेळापत्रक जरुर वाचा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -