Gujarat Election: २०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?

२०१७ च्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला हार पत्करावी लागली होती. मात्र तरीही भाजपासोबत त्यांची कडवी झुंज झाली होती. त्यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात. कोणत्या जिल्ह्यात भाजपा आणि कोणत्या जिल्ह्यात काँग्रेस जिंकली यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात. 

narendra modi and rahul gandhi

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचे (Gujarat Election 2022) बिगुल वाजले आहे. २०१७ प्रमाणेच यंदाही गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर झाली होती. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपा (BJP), काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) अशी तिहेरी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान; 8 डिसेंबरला मतमोजणी

२०१७ च्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत झाली होती. काँग्रेसने सर्वाधिक जिल्ह्यांत जागा जिंकल्या होत्या. मात्र तरीही सत्ता स्थापन करण्यास भाजपाला यश मिळालं. तर, काँग्रेसला निसटती हार पत्करावी लागली होती. त्यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात. कोणत्या जिल्ह्यात भाजपा आणि कोणत्या जिल्ह्यात काँग्रेस जिंकली यावर एक दृष्टीक्षेप टाकुयात.

बहुमतासाठी ९२ जागांची गरज

गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला ९९, काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. ६ जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. राज्यातील जागांवर क्षेत्रवार नजर टाकल्यास मध्य गुजरातमध्ये ६८, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ जागा आहेत.

हेही वाचा – गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आले तर, मोफत वीज आणि कर्जमाफी देण्याचे राहुल गांधींचे आश्वासन

मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठं बळ

मध्य गुजरातच्या ६८ जागांपैकी ४० जागांवर भाजपाने जागा मिळावली होती. तर, काँग्रेसला २४ जागा मिळाल्या होत्या. तर अन्य चार जागांवर अपक्ष उमेदवार जिंकून आले होते. म्हणजेच, मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठं बळ मिळालं होतं. कच्छ-सौराष्ट्र भागात काँग्रेसने भाजपावर मात केली होती. ५४ पैकी ३० जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता तर, भाजपाने २३ जागांवर विजय मिळवला होता. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती.

उत्तर गुजरातमध्ये काँटे की टक्कर 

उत्तर गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाली होती. या भागात ३२ पैकी १७ जागा काँग्रेसच्या वाट्याला तर, १४ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. तर, एका जागेवर काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचा विजय झाला होता. दक्षिण गुजरातमध्ये भाजपाने एकतर्फी विजय मिळवला होता. तेथील २८ पैकी २२ जागावंर भाजपाने जागा काबुत केली तर, बाकीच्या सहा जागांवर काँग्रेसने विजय मिळवला.


मध्य आणि दक्षिण गुजरामध्ये भाजपाने मोठं यश संपादन केलं होतं. तर, सौराष्ट्र-कच्छमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. सौराष्ट्रातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात राजकोटमध्ये काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. तर, जिल्ह्यातील आठ जागांवर भाजपाने जागा जिंकल्या होत्या. उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन भाजपापेक्षा चांगलं राहिलं. या भागात काँग्रेसला भाजपापेक्षा तीन जागा जास्त मिळाल्या होत्या. तर एका जागेवर काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार निवडणून आले होते.

हेही वाचा – पंजाबच्या विजयानंतर आपचे लक्ष्य कर्नाटककडे! आप नेत्यांनी मांडले विजयाचे गणित

मध्य गुजरातमध्ये सर्वाधिक जागा आहेत. यामध्ये अहमदाबाद, बडोदरासारखे अत्यंत महत्त्वाचे जिल्हे येतात. हे जिल्हे भाजपाचे बालेकिल्ला मानले जातात. येथील ६८ जागातील ४० जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. दक्षिण गुजरातमध्ये २८ पैकी २२ जागा भाजपाने मिळवल्या. या भागात काँग्रेस अत्यंत कमकुवत होती. दक्षिण गुजरातमधील अहमदाबाद, बडोदरासारख्या मोठ्या जिल्ह्यांत भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्याने भाजपाला गुजरातमध्ये सत्ता स्थापन करता आली.

गुजरातमध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत. यापैकी अहमदाबादमध्ये २१, सूरतमध्ये १६ आणि बडोदरा येथे १० जागा आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत भाजपाला एकतर्फी विजय मिळाला होता. अमहदाबादमधील २१ पैकी १५, सूरतमध्ये १६ पैकी १५ आणि बडोदरामध्ये १० पैकी आठ जागांवर भाजपाने जागा जिंकल्या.

सात जिल्ह्यांत भाजपा आणि काँग्रेसने खातंही खोललं नाही

गुजरातमधील सात जिल्ह्यांत भाजपा आणि काँग्रेसने साधं खातंही उघडलं नव्हतं. अमरेली, नर्मदा, डांग्स, तापी, अरावली, मोरबी आणि गिर सोमनाथ जिल्ह्यात ना भाजपाचा उमेदवार जिंकला आणि नाही काँग्रेसचा. तर, महल आणि पोरबंदर अशा दोन जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकला नव्हता.

या निवडणुकीत तिहेरी लढत

गेल्या काही दिवसांपासून भाजपाविरोधात विरोधकांनी जोर लावला आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्यात भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केलेले असतानाच मोदीमुक्त भारतसाठीही अनेक विरोधक एकवटले आहेत. गुजरात विधानसभा भाजपा, काँग्रेस आणि आपसाठी निर्णायक ठरणार आहे. भाजपाने बहुतेक राज्यात मुसंडी मारली असून काँग्रेसचा अध्यक्ष बदल्याने काँग्रेसनेही कात टाकली आहे. त्यांनीही नव्याने पक्षबांधणी सुरू केली आहे. तर, गेल्या दोन निवडणुकात ‘आप’लाही चांगली मते मिळाली आहेत. दिल्लीनंतर ‘आप’ने पंजाबमध्येही आपलं वर्चस्व स्थापित केलं आहे. तर, आपने गुजरातमध्येही जोमाने प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये यंदा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.