घरक्राइमगुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदींची रॅली सुरु असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. मोदींच्या सभेत ड्रोनला बंदी असतानाही एक प्रायव्हेड ड्रोन आकाशात उडताना दिसला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवत त्यांना अटक केली आहे. हे ड्रोन खाली न पाडता उतरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेत ड्रोन आला कुठून?

पंतप्रधान मोदींच्या सभा परिसर हा ड्रोन नो फ्लाईंग झोन असतानाही कोणत्याही परवानगीशिवाय हा ड्रोन उडवला जात होता. त्यामुळे पोलिसही सतर्क झाले आणि तातडीने त्यांनी हे ड्रोन खाली आणले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तीन जणांना ड्रोन चालवताना पाहिले, त्यांना जाऊन ड्रोन खाली आणण्यास सांगण्यात आले. यावेळी संबंधितांनी कोणताही वाद न करता तातडीने ड्रोन खाली आणले. त्यानंतर समजले की हे ड्रोन फक्त फोटोग्राफीच्या उद्देशाने उडवले जात होते, त्यात कोणतीही स्फोटके नव्हती. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, यावरही पोलिसांनी भर दिला.

- Advertisement -

मात्र हे प्रकरण पंतप्रधानांशी संबंधित असल्याने पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. निकुल रमेशभाई परमार, राकेश कालूभाई आणि राजेश्वर प्रजापती अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या गुजरातचे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात वेगवान मोर्चाबांधणी सुरु आहे. एकीकडे भाजप आपली सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेसला 27 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत यायचे आहे. तिसरा पर्याय म्हणून आम आदमी पक्षही या मैदानावर सक्रिय आहे.


श्रद्धा हत्याप्रकरणी मुंबईत चौकशी, जबड्याचा भाग दंतचिकित्सकाकडून पडताळणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -