घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातच्या गादीवर कोण बसणार? आप धक्का देणार की भाजपाचेच वर्चस्व राहणार?

गुजरातच्या गादीवर कोण बसणार? आप धक्का देणार की भाजपाचेच वर्चस्व राहणार?

Subscribe

Gujarat Election Result | १५ वर्षांची दिल्ली महापालिकेतील भाजपाची सत्ता आपने उलथवून लावत विजय मिळवला आहे. त्यामुळे असाच निकाल गुजरातमध्येही लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Gujarat Election Result | अहमदाबाद –  गेल्या सहा टर्मपासून गुजरातमधील भाजपाची सत्ता यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात येऊन सत्ताबदल होईल की पुन्हा भाजपाच गुजरातच्या गादीवर विराजमान होईल, याचा निकाल आज लागणार आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा दोन्ही टप्प्यांत कमी मतदान झाले आहे. तसंच, यंदा तिहेरी लढत झाल्याने मते विभागली गेली आहे. त्यामुळे यंदाचा कौल कोणाच्या बाजूने लागेल हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ वर्षांची दिल्ली महापालिकेतील भाजपाची सत्ता आपने उलथवून लावत विजय मिळवला आहे. त्यामुळे असाच निकाल गुजरातमध्येही लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – Gujarat Election Result Live Update : पाच जागांवर भाजपा तर एका जागेवर काँग्रेसची आघाडी

- Advertisement -

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात आज 93 जागांवर मतदान झाले. गुजरातमध्ये 33 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सुमारे 63.31 टक्के मतदान झाले. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) व्यतिरिक्त इतर 36 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केलेत. एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. यामध्ये 339 अपक्षांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस हे सर्व 89 जागांवर लढले आहेत. तर 88 जागांसाठी आपचे उमेदवार रिंगणात आहेत. सुरत पूर्व मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. इतर पक्षांपैकी BSP ने 57, BTP 14 आणि CPI(M) ने चार उमेदवार उभे केलेत.

काँग्रेस, भाजपा आणि आप या तीन पक्षांमध्ये कडवी लढत झाली आहे. आपने दिल्लीत भाजपाचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे गुजरातमध्येही आप मुसंडी मारणार का हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये मोदींचाच बोलबाला, एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपला सत्ता

एक्जिट पोल काय सांगतो?

पोल डायरीने घेतलेल्या पोलनुसार, भाजपला 117-138 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 36-52 जागा, आपला 02-06 जागा, अपक्ष आणि इतर 03 ते 07 जागा मिळण्याचा अंदाज आहे. TV9 गुजरातीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला गुजरातमध्ये 125-130 जागा मिळू शकतात. काँग्रेसला केवळ 40-50 जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष तीन ते पाच जागा जिंकू शकतो. रिपब्लिक टीव्हीने केलेल्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये 128 ते 148 जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. त्याचबरोबर काँग्रेसला 30-42 जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीला 2-10 जागांवर समाधान मानावे लागू शकते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -