घरराजकारणगुजरात निवडणूकमहाराष्ट्रातील राजकारण ठरवणार गुजरातची निवडणूक, भाजपा-काँग्रेसमध्ये जंगी लढत

महाराष्ट्रातील राजकारण ठरवणार गुजरातची निवडणूक, भाजपा-काँग्रेसमध्ये जंगी लढत

Subscribe

काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते आहेत. तसंच, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा दाखल देत गुजरातमध्ये जोरदार प्रचार केला जातोय. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्रातील राजकाणावर आता गुजरातची निवडणूक अवलंबून आहे, असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. 

मुंबई – गुजरातमध्ये निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) प्रचारांना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) आज गुजरातमध्ये (Gujarat) प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरात निवडणुकीला केंद्रीय मंत्र्यांची फौज असताना महाराष्ट्रातील अनेक नेते स्टार प्रचारक म्हणून गुजरातला जाणार आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेते आहेत. तसंच, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा दाखल देत गुजरातमध्ये जोरदार प्रचार केला जातोय. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्रातील राजकाणावर आता गुजरातची निवडणूक अवलंबून आहे, असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा -गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपाच्या रिवाबा जडेजा यांनी भरला उमेदवारी अर्ज

- Advertisement -

गुजरातच्या निवडणूक प्रचारात महाराष्ट्रातील कुमक उतरली आहे. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते गुजरातमध्ये प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या आठवड्यात गुजरातमध्ये दाखल होतील. तर, सध्या चंद्रशेखर बावनकुळे पुढील तीन दिवस गुजरात मुक्कामावर आहेत. तर, सुधीर मुनगंटीवार गेल्याच आठवड्यात गुजरातला जाऊन आले. टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील भाजपाचे नेते गुजरातमध्ये जाऊन प्रचाराला जोर देत आहेत. दरम्यान, गुजरातच्या प्रचारात महाराष्ट्राचा उल्लेख टळत नाही. महाराष्ट्रातील विकास भाजपामुळे साध्य झाला असा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय. त्यामुळे येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपाला किती यश मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतच ‘मोदी मोदी’च्या घोषणा

- Advertisement -

एकीकडे भाजपाने आपला जोर लावलेला असताना काँग्रेसनेही प्रचाराला आघाडी घेतली आहे. भारत जोडो यात्रेला थोडासा ब्रेक देऊन राहुल गांधी पुढील दोन-तीन दिवस गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. आज ते गुजरातच्या राजकोट आणि सूरतमध्ये जनतेशी संवाद साधणार आहेत. तर, महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मंत्री सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माजी मंत्री वसंत पुरके गुजरातमध्ये प्रचाराला सहभागी होणार आहेत. दरम्यान, विजय वडेट्टीवारही याच आठवड्यात गुजरातमध्ये दाखल होणार असून शिवाजीराव मोघे, रामकृष्ण ओझा हे विदर्भातील नेतेही स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. तर अशोक चव्हाणही गुजरातमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील खोक्यावरून गुजरातमध्ये राजकारण पेटलं आहे.

हेही वाचा -‘गुजरात निवडणुकी’साठी नितीन गडकरींवर मोठी जबाबदारी

दरम्यान, गुजरातच्या निवडणुकीवर महाराष्ट्राचंही भविष्य ठरणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -