घर राजकारण गुजरात निवडणूक गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. अशातच या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. अशातच या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यंदा डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणूक होणार असून, या निवडणुकासाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. (gujarat elections 2022 congress releases first list of 43 candidates for gujarat assembly elections)

काँग्रेसच्या या उमेदवारांच्या यादीत पोरबंदरमधून अर्जुन मोधवाडिया आणि घाटलोडियामधून आणि याज्ञिक यांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. या चर्चांनंतर काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 43 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे.

- Advertisement -

यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीची लढत सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष कॉग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी आणि ‘आप’ने भाजपाचा पराभव करण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे समजते.

दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची अद्याप घोषणा केली नाही. तर आम आदमी पक्षाने 100 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली आहे. त्यानुसार, इसुदान गढवी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग तिसऱ्या दिवशी खालावली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -