Eco friendly bappa Competition
घर क्राइम Gujrat : मुलीने केला प्रेमविवाह, नाराज कुटुंबीयांनी उचलंलं टोकाचं पाऊलं, पण...

Gujrat : मुलीने केला प्रेमविवाह, नाराज कुटुंबीयांनी उचलंलं टोकाचं पाऊलं, पण…

Subscribe

Gujrat : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यादरम्यान कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर, दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदाबादमधील ढोलका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. (Gujarat Girl married for love disgruntled family took extreme step but)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुुलीने एकवर्षापूर्वी आपल्या पसंतीच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्यामुळे नाराज असलेल्या राठोड कुटूंबतील जोडप्याने आणि त्यांच्या दोन मुलांनी कथितरित्या विष प्राशन करून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रात्री गुपचूप भेटले अन् घरात गळफास…; नागपूरमध्ये वर्षभराच्या प्रेमाचा धक्कादायक अंत

किरण राठोड (52), त्यांची पत्नी नीताबेन राठोड (50) आणि त्यांची दोन मुले हर्ष (24) आणि हर्षिल (19) यांनी आत्महत्या करण्यासाठी मंगळवारी (6 सप्टेंबर) रात्री विषारी द्रव्य प्राशन केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि पोलिसांना कळवले. मात्र खासगी रुग्णालयात राठोड कुटुंबाला दाखल करण्यात आले, यावेळी डॉक्टरांनी किरण राठोड आणि मोठा मुलगा हर्ष राठोड यांना मृत्यू घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा – किरीट सोमय्यांचा ‘तो’ कथित Video प्रसारित करणे भोवले; ज्येष्ठ पत्रकारावर गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिसांनी किरण राठोड यांच्या मुलीचा पती, तिचे सासरे, इतर नातेवाईक आणि मित्रांसह इतर 18 जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 306, 506(2), आणि 114 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मुलीच्या लग्नामुळे नाराज झालेल्या किरण राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले होते आणि मुलीच्या सासरी जाण्यासही नकार दिला होता. मात्र या वादावर तोडगा काढण्याच्या प्रयत्न करताना मुलीच्या सासरच्या लोकांनी आणि इतर आरोपींनी किरण राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वारंवार मानसिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने राठोड कुटुंबाने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

- Advertisment -