घर देश-विदेश हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा; 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबरला...

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा; 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबरला निकाल

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. ज्यानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. दरम्यान यंदाच्या गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षही रिंगणात उतरला आहे. त्यामुळे ही निवडणुक अधिकच चुरशीची होणार आहे. विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी पूर्ण केली आहे. गेल्या वेळी गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. त्याचवेळी हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 8 डिसेंबरला निकाल लागणार आहेत.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील गेल्या निवडणुकीतील राजकीय स्थिती

हिमाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबर 2017 रोजी 68 जागांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या. यावेळी भाजपला 44, काँग्रेसला 21 जागांवर यश मिळाले, तर तीन जागा इतर पक्षांनी काबीज केल्या. यातील मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, राज्यात भाजपला एकूण मतांपैकी 48.8 टक्के, तर काँग्रेसला 41.7 टक्के मतं मिळाली आहेत. यात उच्चवर्णीय मतं आपल्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचा आधार घेतला.

- Advertisement -

2017 मध्ये गुजरात विधानसभेच्या 198 जागांसाठी 2 टप्प्यांत निवडणुका झाल्या. यावेळी सरासरी 68.41 टक्के मतदान झाले. या निवडणुकांमध्ये भाजपने 99 तर काँग्रेसने 77 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 1, भारतीय ट्रायबल पार्टी 2 आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या. यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या.


शिवलिंगाची कार्बन डेटिंग होणार नाही; ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायाधीशांचा मोठा निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -