घरताज्या घडामोडीवरातीला निघालेल्या वऱ्हाडी टेम्पोचा अपघात; ११ जण ठार

वरातीला निघालेल्या वऱ्हाडी टेम्पोचा अपघात; ११ जण ठार

Subscribe

गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात रानू - महुवाडला रस्त्यावर भीषण अपघात झाला असून या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात रानू – महुवाडला रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रक आणि टेम्पो यामध्ये जोरदार टक्कर होऊन हा अपघात झाला असल्याचे बोले जात आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून वऱ्हाडी हे वरातीसाठी निघाले होते. लग्नाच्या वऱ्हाडीने भरलेला टेम्पो पादरा तहसील परिसरातील रानू आणि महुवाडा याठिकाणी पोहोचताच समोरुन येणाऱ्या ट्रकला टेम्पोची धडक बसली आणि या धडकेत भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत टेम्पोचा अक्षरश: चुरडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोक घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना अपघाताची माहिती देताच बचावरकार्य सुरू झाले. माहिती मिळताच, स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि टेम्पोमध्ये अडकलेल्या लोकांना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील ११ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच डॉक्टरांनी जखमींना प्राथमिक उपचारानंतर बडोदाला उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला दिला असून सर्व जखमींवर बडोदा येथील सर सयाजी जनरल (एसएसजी) रुग्णालयात दाखल करत सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -