घरदेश-विदेशगुजरात नगरपालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसला मोठा धक्का

गुजरात नगरपालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसला मोठा धक्का

Subscribe

कॉंग्रेस नेत्यांना जबरदस्त धक्का

गुजरातमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये गुजरातच्या सत्ताधारी भाजपने भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. भाजप आपल्या विजयाचा यश साजरे करत असताना काँग्रेसच्या गोटात भयान शांतता पसरली आहे. गुजरामध्ये २८ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या माहापालिका निवडणुकांमध्ये ८१ पालिका, ३१ जिल्ह्यातील २३१ तालुका ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरातमधील निवडणुकींत पराभव झालेल्यांमध्ये एक आमदार आणि ७ आमदारांची मुलेही आहेत. गुजरात नगरपालिकांच्या निवडणूकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

गुजरात महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहेत. मंगळवारी (२ मार्च) लागलेल्या निवडणुकीच्या निकालात गुजरातमधील ३१ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तर ८१ नगरपालिकांपैकी भाजपने ७९ नगरपालिकांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला कोणत्याही जिल्ह्यात खाते खोलता आले नसल्यामुळे वाट्याला मोठे अपयश आले आहे. काँग्रेस फक्त २ नगरपालिकांवर विजय मिळण्यात यशस्वी झाली आहे. तालुका ग्रामपंचायतीत २३१ जागांपैकी भाजप १९८, काँग्रेसला ३३ तर इतर पक्षांना खातेही खोलता आले नाही.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, गुजरातच्या नगरपालिका, तालुका ग्रामपंचायत आणि जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपला स्पष्ट बहुमत देऊन विकासावर विश्वास दाखवला आहे. संपूर्ण राज्य विकासावर, कायदा-सुव्यवस्थेवर विश्वास ठेवून साथ दिल्याबद्गल सर्व जनतेचे आभार मोदींनी मानले आहेत. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल गुजरातच्या जनतेला धन्यावद देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कॉंग्रेस नेत्यांना जबरदस्त धक्का

गुजरातमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वात मोठा झटका हा आनंद जिल्ह्यातील पेटलाडमधील काँग्रेस आमदार निरंजन पटेल यांना बसला आहे. आमदार आनंद निरंजन हे तीनवेळी आमदार म्हणून निवडून आले होते. आमदार आनंद निरंजन यांना पेटलाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि पाचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्याच नगरपालिकेत त्यांचा मुलगा सौरभ पटेल यांनाही भाजपच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला. तसेत इतर आमदारांच्या मुलांनाही नगरपालिका निवडणुकीत मोठा पराभव पत्कारावा लागला आहे.


हेही वाचा : नोटबंदीमुळे देशात आली बेरोजगारी; मनमोहन सिंहंनी व्यक्त केली नाराजी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -