Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश पत्नीच्या अजब मागणीमुळे पतीने दिला घटस्फोट

पत्नीच्या अजब मागणीमुळे पतीने दिला घटस्फोट

पत्नीच्या दारु विकण्याच्या अट्टहासाला वैतागून पतीनेे घटस्फोट दिल्याचा घटना समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पत्नीने घटस्फोट दिल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या असतील. मात्र, गुजरातच्या वडोदरा शहरामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका ४१ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३७ वर्षांच्या पत्नीला घटस्फोट देण्याची याचिका वडोदराच्या फॅमिली कोर्टात दाखल केली आहे. या व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदाही दारुला स्पर्श केला नाही. परंतु, त्याची पत्नी त्याच्यावर दारुचा व्यवसाय करण्यासाठी दबाव आणत आहे. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे ठरवले आहे.

दर आठवड्याला रेस्टॉरंट आणि मल्टीप्लेक्स फिरायला हवे

मागील १५ वर्षांपासून रमेश आप्टे मसाल्याच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करत आहे. परंतु, त्याच्या पत्नीला ते काम आवडत नाही. कारण, त्याला मिळणारे वेतन हे फार कमी असल्याची तिची तक्रार आहे. आप्टेंनी सांगितल्याप्रमाणे रेश्माला प्रत्येक आठवड्यात रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आणि मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघायला आवडते. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायची तिची इच्छा असते. परंतु, आपले वेतन पुरेसे नसल्याने त्याला त्याच्या बायकोचे चोचले परवडत नाहीत.

दारुचा व्यावसाय करण्याचा अट्टहास

- Advertisement -

फॅमिली कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत रमेश यांनी सांगितले की, ‘माझी पत्नी रेश्माचे असे म्हणणे आहे की, मी तिच्या माहेरच्या लोकांप्रमाणे दारु विक्रिचा व्यावसाय करायला हवा. हा व्यवसाय केल्याने मला जास्त पैसे मिळतील, असे तिचे मत आहे. मागील दोन वर्षांपासून माझी पत्नी आणि तीचे माहेरचे लोक दारुचा व्यवसाय करण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करत आहेत. ज्यामुळे तिला आरामात आयुष्य जगता येईल आणि तिचे सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील’.

पत्नीचीही रमेश विरोधात पोलीस तक्रार

पत्नीच्या दबावानंतरही रमेशला कारखान्यात कामगार म्हणून काम करायचे आहे. एवढेच नव्हे तर फॅमिली कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत रमेशने लिहिले आहे की, मी दारुचा व्यवसायास करण्यास नकार दिल्यानंतर पत्नीने माझ्या म्हाताऱ्या आईला त्रास द्यायला सुरुवात केली आहे, जेणेकरुन माझी आई मला या व्यवसायासाठी भाग पाडेल.

- Advertisement -

या विषयावर रमेश आणि रेश्मा या दोघा पती-पत्नींमध्ये नेहमी भांडणे होत. त्यामुळे रेश्माने आपल्या दोन्ही मुलांना माहेरी नेले आणि रमेशच्या विरोधात करेली बाग पोलीस स्थानकात त्याविरोधात तक्रार दाखल केली. रमेशने आपल्याला मारझोड करत आपले शोषण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यानंतर रमेशने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली.

- Advertisement -