घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातमध्ये आपचा एकही उमेदवार विजयी होणार नाही; अमित शाह यांचा दावा

गुजरातमध्ये आपचा एकही उमेदवार विजयी होणार नाही; अमित शाह यांचा दावा

Subscribe

गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे व त्यांची वाढती लोकप्रियता याचा फायदा नक्कीच निवडणुकीत होईल. भाजपने गुजरातचा विकास केला आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निकालात भाजपचा विजय निश्चित आहे. हा विजच मोठ्या मताधिक्यांचा असेल, असेही मंत्री शाह यांनी ठामपणे सांगितले.

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. गुजरात निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) उडी घेतल्याने प्रचारात आरोप-प्रत्यारोप रंगले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर आपचा एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचा दावा केला आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मंत्री अमित शाह यांनी आपसोबतच काँग्रेसच्या आव्हानावरही भाष्य केले. मुलाखतीत मंत्री शाह यांनी आपवर टीका केली. निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्यके पक्षाला आहे. आपने प्रचारात अनेक घोषणा केल्या आहेत. गुजरातची जनता अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही. निवडणुकीच्या निकालात आपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावा मंत्री शाह यांनी केला.

- Advertisement -

गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे व त्यांची वाढती लोकप्रियता याचा फायदा नक्कीच निवडणुकीत होईल. भाजपने गुजरातचा विकास केला आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निकालात भाजपचा विजय निश्चित आहे. हा विजच मोठ्या मताधिक्यांचा असेल, असेही मंत्री शाह यांनी ठामपणे सांगितले.

काँग्रेस पक्षाचे आव्हान निवडणुकीत आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री शाह म्हणाले, गुजरात निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रतिस्पर्धी आहे. पण संपूर्ण देशभरात काँग्रेसची झालेली अवस्था बघता निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे भाजपची पुन्हा एकहाती सत्ता येईल.

- Advertisement -

गुजरात निवडणुकीत आपने जोरदार प्रचार केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या काळात देशाचा विकास खुंटला. भाजपने गुजरातचा विकास केला नाही. आप गुजरातचा सर्वांगीण करेल, असे आश्वासन केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला दिले आहे. तर, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा दावा केला आहे. दुसरीकडे विजयासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातची जनता कोणाला कौल देते व कोणाला घरचा रस्ता दाखवते हे ८ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -