घरताज्या घडामोडीसुरक्षेचे कारण देत गुजरात पोलिसांना मला सर्वसामान्यांमध्ये जाण्यापासून रोखायचे होते : केजरीवाल

सुरक्षेचे कारण देत गुजरात पोलिसांना मला सर्वसामान्यांमध्ये जाण्यापासून रोखायचे होते : केजरीवाल

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले. सोमवारी अहमदाबादमध्ये पोलिसांनी सुरक्षेचा हवाला देत अरविंद केजरीवाल यांना अडवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले. सोमवारी अहमदाबादमध्ये पोलिसांनी सुरक्षेचा हवाला देत अरविंद केजरीवाल यांना अडवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर पोलीस आणि केजरीवाल यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Gujarat Police wanted to prevent me from going among the public by referring to security says arvind Kejriwal)

दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या हॉटेलमधून एका ऑटोचालकाच्या ऑटोने त्यांच्या घरी जेवणासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांनी केजरीवालांना ऑटेने प्रवास करण्यापासून रोखले. त्यावेळी संतप्त केजरीवाल यांनी “तुम्ही मला जबरदस्तीने सुरक्षा देत आहात. मला हे संरक्षण नको आहे”, असे म्हटले.

- Advertisement -

“म्हणूनच गुजरात राज्यातील जनता नाराज आहे, कारण नेते जनतेत जात नाहीत आणि आम्ही लोकांमध्ये जात आहोत, मग तुम्ही आम्हाला थांबवत आहात. तुमच्या प्रोटोकॉलने जनतेला नाखूष ठेवले आहे”, असेही केजरीवाल यांनी म्हटले.

केजरीवाल आपल्याला पोलिस संरक्षणाची गरज नसल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, त्यानंतर केजरीवाल यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी ‘आम आदमी पार्टी’ गुजरातमध्ये आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांत त्यांनी अनेकदा गुजरातला भेट दिली आहे. यादरम्यान केजरीवाल यांनी महिला आणि बेरोजगार तरुणांसाठी भत्ते, दर्जेदार आरोग्य सेवा आणि शिक्षण आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज अशा अनेक घोषणा केल्या आहेत.


हेही वाचा – समृद्धी महामार्गासाठी पुढचा मुहूर्त दिवाळीचा? लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी येण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -