घरताज्या घडामोडीगुजरातच्या एका जागेवर 'सायकल' धावली, लेडी डॉनच्या मुलाने केला चमत्कार

गुजरातच्या एका जागेवर ‘सायकल’ धावली, लेडी डॉनच्या मुलाने केला चमत्कार

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल अंतिम टप्प्यात आले आहेत. गुजरतमध्ये भाजपने १५७ जागांवर मुसंडी मारली असून काँग्रेस १६, तर आपने ५ जागांवर ताबा मिळवला आहे. मात्र, दुसरीकडे निवडणुकीचे निकाल पाहता गुजरातच्या एका महत्त्वपूर्व जागेवर अखिलेश यादव यांच्या सपाची (SP) सायकल धावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये समाजवादी पार्टीने एन्ट्री मारली आहे.

पोरबंदर क्षेत्रात सपाची एन्ट्री

- Advertisement -

गुजरातच्या पोरबंदर येथील कुतियाना जागेवर सपाने विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कुतियाना मतदारसंघातून सपा उमेदवार कांधलभाई जडेजा आघाडीवर आहेत. कांधलभाई जडेजा ४५१८८ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजप उमेदवार झेलीबेन भुराभाई ओडेदरा यांना २५८३९ मतं मिळाली आहेत.

४५ टक्क्यांहून अधिक मतं

- Advertisement -

कुतियाना मतदारसंघात सपाचे उमेदवार कांधलभाई यांनी ४५ टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. मात्र, भाजपला केवळ २६.१२ टक्केच मतं मिळाली आहेत.

लेडी डॉनच्या मुलाचा चमत्कार

कुतियाना जागेवर विजयी झालेले सपा उमेदवार कांधल जडेजा यांच्याकडून या भागात विकासकामं वेगाने करत असल्याचा दावा ते नेहमीच करत आले आहेत. कांधल जडेजा हा संतोष बेन यांचा मुलगा आहे. संतोष बेन यांचे नाव गुजरातची लेडी डॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बेनवर राज्यातील ५०० हून अधिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संतोषवर १४ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. संतोष बेन यांच्या जीवनावर १९९९ मध्ये गॉड मदरच्या नावाने चित्रपटही बनवण्यात आला होता.

भाजपला मोठे बहुमत

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाला विक्रमी बहुमत मिळाले आहे. मागच्या वेळेपासूनही काँग्रेसची खराब कामगिरी दिसून येत आहे. भाजप १५८, काँग्रेस १६, आम आदमी पार्टी ५ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहे.


हेही वाचा : आप नावाच्या पार्टीचे १२ वाजले, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार; फडणवीसांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -