घरCORONA UPDATECoronaVirus: गुजरातच्या वैज्ञानिकांना मोठं यश; कोरोना विषाणूच्या डीएनएची संरचना समजली!

CoronaVirus: गुजरातच्या वैज्ञानिकांना मोठं यश; कोरोना विषाणूच्या डीएनएची संरचना समजली!

Subscribe

जगात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण देशात वैज्ञानिक नवीन मार्गाने शोध करत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लस कशी तयार करावी याचा शोध घेतला जात आहे. मात्र आज तकच्या वृत्तानुसार कोरोनाच्या संकटात गुजरातच्या वैज्ञानिकांनी मोठं यश प्राप्त झालं आहे. गुजरातमधली वैज्ञानिकांनी देशात पहिल्यांदाच कोरोना विषाणूचा जीनोमा सिक्वेंस म्हणजेच कोरोना विषाणूच्या डीएनएची पूर्ण रचनेचा शोध लागला आहे.

गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या (जीबीआरसी) वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूचा संपूर्ण जीनोमा सिक्वेंस शोधला आहे. जीबीआरसीचे संचालक चैतन्य जोशी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. नंतर गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयानेही रिट्विट करून वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.

- Advertisement -

गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यलयाने ट्विट करत असं लिहिलं आहे की, जीबीआरसीच्या वैज्ञानिकांचा आम्हाला अभिमान आहे. कोरोना विषाणूचा कोविड-१९ म्हणजे एसएआरएस-सीओव्ही-२ (SARS-CoV-2) संपूर्ण जीनोमा सिक्वेंस देशात कोणत्याही राज्यातील प्रयोगशाळेत सापडला नाही आहे. यामुळे कोरोना विषाणूची उत्पत्ती, औषधे कशी तयार करायची, लस कशी विकसित करायची, विषाणूचा टार्गेट आणि विषाणूचा नाश कसा होईल याविषयी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येतील.

- Advertisement -

जीबीआरसीचे संचालक चैतन्य जोशी यांनी सांगितलं की, आम्ही गुजरात मधील काही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शरीरातून नमुने घेतले. अनेक ठिकाणाहून नमुने घेतल्यानंतर सुमारे १०० नमुन्यांची डीएनए चाचणी केली. तेव्हा आम्हाला संपूर्ण जीनोमा सिक्वेंस शोधण्याच यश मिळाले. यादरम्यान कोरोना विषाणूमध्ये नऊ बदल झाल्याचं पाहायला मिळाले. आम्हाला कोरोनाची लस तयार करण्यात हे फायदेशीर ठरेल. तसंच त्यांची औषध तयार करताना मदत होईल.

आतापर्यंत गुजरातमध्ये कोरोनाचे ९२९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३६ जणांचा मृत्यू झाले आहेत. तसंच ७३ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: हीच काय भलतचं! मास्क म्हणून लावला डायपर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -