घरताज्या घडामोडीगुजरातच्या केमिकल फॅक्टरीच्या शक्तीशाली स्फोटात ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गुजरातच्या केमिकल फॅक्टरीच्या शक्तीशाली स्फोटात ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील एक केमिकल फॅक्टरीत जोरदार स्फोटाने 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एका औद्योगिक क्षेत्रातील ही फॅक्टरी आहे. अहमदाबादपासून हे ठिकाण जवळपास २३५ किलोमीटर अंतरावर आहे. एका रिअॅक्टरच्या स्फोटात हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ३ च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती पोलिस अधिक्षक लीना पाटील यांनी दिली आहे.

घटनेनंतर पोलीसांनी प्रकरणाचा पंचनामा सुरू केला असून स्फोटाचे नेमके कारण शोधायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत त्यामागील कारणे शोधायला सुरूवात केली आहे. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, स्फोटातील संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत एेकायला मिळाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या स्फोटात एका बेपत्ता कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे. नजीकच्या भागात या कर्मचाऱ्याचा शोधमोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

- Advertisement -

 

भरूचमध्ये स्फोटाच्या घटना

भरूचच्या केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सातत्याने केमिकल स्फोटाची प्रकरणे ही सातत्याने समोर आली आहेत. याआधी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी जीआडीसीच्या केमिकल कंपनीच्या यूपीएल ५ प्लांटला स्फोटानंतर आगा लागली होती. आगीच्या संपर्कात आल्याने जवळपास २४ लोक जखमी झाले होते. या स्फोटाचा आवाज १५ किलोमीटरपर्यंत एेकायला मिळाला होता. एखाद्या भूकंपासारखा या स्फोटाचा आवाज झाला होता. त्यानंतर काही लोकांना वडोदरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -