घरक्राइमपंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरात एटीएसने घेतले ताब्यात

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरात एटीएसने घेतले ताब्यात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरात एटीएसने अटक केली आहे. धमकी दिल्याच्या आरोपाखाली अमन सक्सेना या आरोपीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आरोपीने इंजिनिअरिंगचे शिक्षणमध्येचं सोडले. या प्रकरणात गुजरातमधील एका तरुण, तरुणीचे नाव देखील समोर आले आहे. गुजरात एटीएस या सर्वांचा शोध घेत होती, दरम्यान शनिवारी रात्री उशीरापर्यंत चौकशी केल्यानंतर एटीएसच्या पथकाने अमनला अटक केली.

गुजरात एटीएसचे निरीक्षक व्हीएन बघेला हे आपल्या पथकासह रात्री 10 च्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमन सक्सेनाला आदर्शनगरमधून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या आयडीवर ईमेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात गुजरातमधील एका तरुण आणि तरुणीचे नाव समोर आले, ज्यानंतर एटीएसचे पथक सक्रिय झाले, ज्यानंतर एटीएसचे संयुक्त पथक तिन्ही आरोपींचा शोध घेत होते.

- Advertisement -

सर्व्हिलान्सद्वारे अमनचे लोकेशन ट्रेस होताच हे पथक रात्री शहरात पोहोचले. आरोपी अमन सक्सेना हा काही काळापूर्वी राजर्षी कॉलेज, बरेली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता, परंतु त्याने ते अपूर्ण सोडले. आरोपींनी कोणत्या उद्देशाने धमकी दिली, याचा तपास सुरू आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक व्हीएल बघेला यांनी इतर दोन आरोपींबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. एटीएस पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

एटीएसने पकडलेला आरोपी अमन सक्सेनाला यापूर्वी लॅपटॉप चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. यावेळी पोलिसांनी विद्यार्थी समजून लॅपटॉप जप्त करत सोडून दिले. मात्र यानंतरही त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसले. दरम्यान अमन सक्सेना काही दिवसांपूर्वी घरी आला होता. यामुळे गुजरात एटीएस सातत्याने त्याचे लोकेशन ट्रेस करत होती, एटीएसकडे नंबर होता, मात्र लोकेशन ट्रेस करता आले नाही. यावेळी त्याच्या वडिलांच्या नंबरवर सिम टाकताच एटीएसला लोकेशन मिळाले. यानंतर पथकाने छापा टाकून अमनला अटक केली. अमनशिवाय त्याने आणखी काही मोबाईल सोबत घेतले आहेत.


कामाख्या देवी न्यायाचीही देवता, ४० आमदारांचा न्याय करेल; संजय राऊतांची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -