Gujrat Train Fire : गुजरातच्या गोध्रामध्ये ट्रेनला भीषण (Gujrat Train Fire) आग लागल्याची बातमी समोर येत आहेत. प्रवाशांना उतरवण्यासाठी गुजरातच्या जकोट रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका मेमू ट्रेनच्या इंजिनला अचानक आग लागली आणि ही आग थोड्याच वेळात दोन बोगींपर्यंत पसरली. त्यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले होते. (Gujrat Train Fire Godhra bound train caught fire A stampede among passengers)
हेही वाचा –पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात पोहोचले अन्…
मेमू ट्रेनच्या इंजिनला अचानक आग लागलयानंतर ती दोन बोगींपर्यंत पोहचली. शेवटच्या बोगींना आग लागल्यामुळे बाकीच्या डब्यांमधील प्रवासी सुखरूप बाहेर पडले. मात्र इंजिनला अचानक आग लागल्यामुळे त्याठिकाणी चेंगराचेंगरीचे वातावरण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही मेमू ट्रेन दाहोदहून गोध्राच्या दिशेने जात होती.
VIDEO | Fire breaks out in engine of Dahod-Anand Memu train near Dahod in Gujarat. More details are awaited. pic.twitter.com/1KvAbBZd76
— Press Trust of India (@PTI_News) September 15, 2023
दरम्यान, आज (15 सप्टेंबर) 09350 क्रमांकाची मेमू ट्रेन नेहमप्रमाणे दाहोदहून प्रवाशांना घेऊन 10 किमी अंतरावरील जेकोट येथे पोहोचली. रेल्वे स्थानकावर पोहोचताच प्रवासी उतरत असताना अचानक इंजिनला लाग लागली आणि त्यामागील बोगींतून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. या आगीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली असून आगीचे कारण तपासानंतर समोर येईल.
हेही वाचा – न्यायालयाचे निर्णय राजकारणाच्या दृष्टीने..; नक्षलवादी गौतम नवलखा केसबद्दल निवृत्त न्यायाधीशांचा खुलासा
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील दौंड येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या यार्डमधील साईडला उभ्या केलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक लाग लागली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठी धावपळ झालेली पाहायला मिळाली. सदर घटना घडताच घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले यानंतर आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत रेल्वेच्या बोगीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.