गुरु गोविंद सिंगांच्या जयंतीनिमित्त पीएम मोदींची मोठी घोषणा; दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बालदिन साजरा होणार

धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला. धर्मरक्षणासाठी त्यांचे चार पुत्र शहीद झाले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते. पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले की, 'साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग शहीद झाले, त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल. या दोन्ही महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले.

Narendra modi
Narendra modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांचे 10 वे गुरु गोविंद सिंग (10th Guru of the Sikhs) यांच्या जयंतीनिमित्त एक मोठी घोषणा केलीय. आता दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाशपर्वाच्या शुभ मुहूर्तावर मला हे सांगताना अभिमान वाटतो की, या वर्षीपासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला. धर्मरक्षणासाठी त्यांचे चार पुत्र शहीद झाले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते. पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले की, ‘साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग शहीद झाले, त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल. या दोन्ही महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले.

पीएम मोदींनी पुढे लिहिले की, ‘माता गुजरी, श्रीगुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. अन्यायापुढे ते कधी झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे.

अन् त्यांचे पुत्र शहीद झाले

धर्माच्या रक्षणासाठी मुघलांशी लढताना गुरु गोविंदजींनी आपल्या सर्व पुत्रांचे बलिदान दिले. बाबा अजित सिंह आणि बाबा जुझार सिंह यांनी 40 शूर शीख योद्धांसह मुघलांविरुद्ध चमकौरची लढाई लढली. हे युद्ध 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1704 मध्ये पंजाबमधील चमकौर येथे झाले. गुरु गोविंद सिंग सुरक्षित राहिले, पण बाबा अजित सिंग आणि बाबा जुझार सिंग या युद्धात शहीद झाले. 26 डिसेंबर 1704 रोजी सरहिंदच्या नवाबाने गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगण्यात आले होते. माता गुजरीसुद्धा शहीद झाल्या होत्या.