घरदेश-विदेशGurugram : दिल्ली-जयपूर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; अपघातात दोघांचा मृत्यू, 12...

Gurugram : दिल्ली-जयपूर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; अपघातात दोघांचा मृत्यू, 12 गंभीर

Subscribe

गुरुग्राम : दिल्ली-जयपूर महामार्गावर बुधवारी (8 नोव्हेंबर) सायंकाळी उशिरा एका खासगी बसला भीषण आग लागली. महामार्गावरील गुगल कार्यालयासमोर झालेल्या या अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेदांता, सिव्हिल आणि दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बस अरुणाचल प्रदेशची असल्याचे समोर आले आहे. (Gurugram Private bus caught fire on Delhi Jaipur highway Two died in the accident 12 serious)

हेही वाचा – क्षयरुग्णांच्या संख्येत 16 टक्क्यांची घट, जगाच्या तुलनेत दुप्पट वेग

- Advertisement -

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-जयपूर हायवेवरील डबल डेकर बसमधून अचानक धूर येऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य समजून चालकाने बस बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र लगेच बसला भीषण आग लागली. प्रवाशांनी आरडाओरडा करत खिडक्यांच्या काचा फोडत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही काही प्रवाशी आगीत होरपळले. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी सांगितले की, बचाव मोहिमेदरम्यान, दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत बसमधून बाहेर काढण्यात आले. मात्र मृतदेहांची ओळख पटू शकली नाही. बस दिल्लीहून जयपूरला जात होती. आगीचे कारण कळू शकलेले नाही. बसमध्ये किती प्रवासी होते, ते कुठे जात होते, याची माहिती घेतली जात आहे. तसेच महामार्गावर बसला लागलेल्या आगीवर स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करत बचाव आणि मदत पथक घटनास्थळी रवाना केले. अशा परिस्थितीत जळालेल्या लोकांसाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस-प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ जळालेल्या लोकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत धक्कादायक विधान, म्हणाले…

प्रवाशी 30 ते 50 टक्के भाजले

जिल्हा सिव्हिल रुग्णालयातील डॉ. मानव यांनी सांगितले की, सात जणांना जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. प्रवासी 30 ते 50 टक्के भाजले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -