Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश गुरुग्राम गोळीबार प्रकरण; न्यायाधिशाच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

गुरुग्राम गोळीबार प्रकरण; न्यायाधिशाच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना घडली आहे. न्यायाधिशाच्या पत्नी आणि मुलावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये दोघे ही गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान न्यायाधिशाच्या पत्नीचा मृत्यू झाला.

Related Story

- Advertisement -

गुरुग्राममध्ये शनिवारी न्यायाधिश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर बेछुट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गुरुग्रामच्या सेक्टर – ४९ मधील आर्केडिया मार्केटमध्ये भर दिवसा ही घटना घडली. न्यायाधिश कृष्णकात शर्मा यांच्या पत्नी आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकानेच त्यांच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये कृष्णकांत यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाला होता. दोघांवर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आरोपी हेड कॉन्स्टेबल महिपाला गुडगाव-फरीदाबाद मार्गावरुन गुरुग्राम पोलिसांनी अटक केली.

भरदिवसा केला गोळीबार

- Advertisement -

न्यायाधिश कृष्णकांत यांच्या घरी सुरक्षिततेसाठी गेल्या दोन वर्षापासून हेड कॉन्स्टेबल महिपाल काम करत होता. शनिवारी दुपारी गुरुग्रामच्या सेक्टर – ४९ मधील आर्केडिया मार्केटमध्ये कृष्णकांत यांची पत्नी रीतू (३८) आणि मुलगा ध्रुव (१८) शॉपिंगसाठी गेले होते. त्यांच्यासोबत महिपाल देखील होता. या मार्केटमध्ये खेरदीसाठी मोठी गर्दी असते. अशा गजबलेल्या ठिकाणीच महिपाल याने रितू आणि ध्रुववर गोळीबार केला. त्यानंतर महिपाल फरार झाला. या घटनेची माहिती गुरुग्राम पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आसपासच्या परिसरामध्ये नाकाबंदी केली. त्यानंतर गुडगाव-फरीदाबाद मार्गावरुन महिपालला पोलिसांनी अटक केली.

आरोपी हेड कॉन्स्टेबल महिपाल

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही गोळीबाराची घटना मोबाईलमध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी महिपालने दोघांवर गोळी झाडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या न्यायाधिशांचा मुलगा ध्रुवला रस्त्यावरुन खेचून गाडीमध्ये घालताना दिसत आहे. कारच्या मागच्या सीटीवर ध्रुवला टाकण्याचा प्रयत्न महिपाल करत होता मात्र दोन वेळा प्रयत्न करुन असफल झाल्यानंतर त्याने ध्रुवला तिथेच सोडून फरार झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

न्यायाधिनाशाच्या पत्नीचा मृत्यू

महिपाल फरार झाल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित असलेले नागरिक जखमी ध्रुव आणि रितु यांच्या मदतीसाठी धावून आले. या नागरिकांनी ध्रुवच्या डोक्याला कपडा बांधून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांना जवळच्या पार्क रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे दोघांना मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारा दरम्यान रितू यांचा मृत्यू झाला तर ध्रुवची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दोघांच्या वागणुकीला कंटाळला होता

प्राथमिक तपासामध्ये असे समोर आले आहे की, आरोपी महिपाल न्यायाधिश कृष्णकांत यांच्या पत्नी आणि मुलाच्या वागणुकीला कंटाळला होता. तो या दोघांना धडा शिकवू इच्छित होता. तसंच गेल्या काही दिवसापासून आरोपी झोपलेला नव्हता असे पोलिसांनी सांगितले. मात्र या हत्ये मागचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही. गोळीबारानंतर आरोपीनेच न्यायाधिशाच्या कुटुंबियांना फोन करुन सर्व माहिती दिली आणि घटनास्थळावर पोहचण्यास सांगितले होते.

- Advertisement -