घरदेश-विदेशकरवा चौथच्या रात्रीच गर्भवती पत्नीचा खून

करवा चौथच्या रात्रीच गर्भवती पत्नीचा खून

Subscribe

प्रेयसी बरोबर लग्न करायचे म्हणून पत्नीचा काटा काढणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. करवा चौथच्या मुहूर्तावर हा खून करण्यात आला.

करवा चौथच्या मुहूर्तावर पतीने गरोदर पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेचा ८ व्या मजल्यावरून कोसळून मृत्यू झाला आहे. सुरूवातीला पोलिसांनी याप्रकरणी अपघातीमृत्यूची नोंद केली होती. मात्र या महिलेचा खून केला असल्याचे उघडकीस आले. या घटनेत पतीनेच ८ व्या मजल्यावरून खाली ढकलले आहे. ही घटना गुरूग्राम येथे घडली. आरोपी पती एका खाजगी कंपनीत एक्जीक्यूटिव्ह म्हणून कार्यरत आहे तर त्याची पत्नी दीपिका चौहान (३२) ही बँकेत कार्यरत होती. प्रेयशीबरोबर लग्न करण्याचा पत्नीचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेयशीबरोबर लग्न करायचे होते

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपी पतीचे प्रेम प्रकरण असल्याचे उघडकीस आले आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांमुळे या कारणामुळे भांडण होत होते. यामुळे दोघांमध्ये नेहेमी तणावाचे वातावरण होते. आरोपी पतीची प्रेयसी ही टीव्ही पत्रकार होती. शेफाली बसीन असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. दीपिकाचे वडिल हरिकृषण अहुजा यांनाही या बाबत कल्पना होती. २०१३ मध्ये या दोघांचा प्रेमविवाह केला होता. या दोघांना ४ वर्षाची मुलगी आणि ६ महिन्याची मुलगा होती. दीपिका ही तिसऱ्यांदा गरोदर होती. दीपिकाने करवा चौथच्या रात्री पतीसाठी उपवास धरला होता. आपल्या फ्लॅटच्या बालकनीत तिने पतीची पूजा केली. मात्र पूजेनंतर त्याने दीपिकाला खाली ढकलून दिले. धकलण्यापूर्वी दीपिकाने पतीला दया याचना मागितली. मात्र पतीने तिला खाली ढकलून दिले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सुरूवातीला पोलिसांनी अपघातीमृत्यूची नोंद केली. मात्र शेजाऱ्यांकडून माहिती मिळवून पोलिसांनी तपास केला असता ही माहिती उघडकीस आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -