घरताज्या घडामोडीभरधाव कार दुभाजकाला धडकली; 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 6 जण जखमी

भरधाव कार दुभाजकाला धडकली; 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 6 जण जखमी

Subscribe

गाडीने जात असलेल्या 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना गुवाहाटी येथे घडली. 7 इंजिनियर विद्यार्थी ज्या कारने प्रवास करत होते. ती कार आधी दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर दुसऱ्या गाडीला धडकली. या गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गाडीने जात असलेल्या 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना गुवाहाटी येथे घडली. 7 इंजिनियर विद्यार्थी ज्या कारने प्रवास करत होते. ती कार आधी दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर दुसऱ्या गाडीला धडकली. या गाडीचा वेग खूप जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (guwahati engineering student accident 7 dead and several others injured jalukbari assam)

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील जलुकबारी येथील डीसीपी कार्यालयासमोर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने ब्रॉयलर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली. या अपघातात 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाव्या सत्रात हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. वसतिगृह क्रमांक २ मधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

निओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी या अपघातातील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर या अपघातात इतर 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. छात्र मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून देण्यात आले.

- Advertisement -

याप्रकरणी अधिक तपास केला असता, स्कॉर्पिओ गाडीचा वेग जास्त होता. आधी या गाडीने दुभाजकाला धडक दिली. हा वेग नियंत्रणात न आल्याने गाडी पुढे गेली आणि दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली. या अपघातानंतर साधारण दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. हळूहळू वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली आहे.


हेही वाचा – वांद्रे वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचे नाव देणे कितपत योग्य? काँग्रेसचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -