घरक्राइमआसाममध्ये रुग्णवाहिकेतून गुवाहाटी पोलिसांनी जप्त केले १४ कोटींचे ड्रग्ज; एकाला अटक

आसाममध्ये रुग्णवाहिकेतून गुवाहाटी पोलिसांनी जप्त केले १४ कोटींचे ड्रग्ज; एकाला अटक

Subscribe

आसामच्या गुवाहाटी परिसरात रुग्णवाहिकेतून अमली पदार्थांची तस्करी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या रुग्णवाहिकेचा उपयोग माणसाचा जीव वाचवण्यासाठी केला जातो, त्याच रुग्णवाहिकेचा वापर ड्रग्ज तस्करांनी आपल्या धंद्यासाठी केला होता.

आसामच्या गुवाहाटी परिसरात रुग्णवाहिकेतून अमली पदार्थांची तस्करी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या रुग्णवाहिकेचा उपयोग माणसाचा जीव वाचवण्यासाठी केला जातो, त्याच रुग्णवाहिकेचा वापर ड्रग्ज तस्करांनी आपल्या धंद्यासाठी केला होता. पोलिसांना संशय येऊ नये आणि अमली पदार्थ पसरवण्याचा त्यांचा धंदा सुरूच होता. मात्र, मंगळवारी रात्री पोलिसांनी ड्रग्ज तस्करांचा या प्लॅनचा पर्दाफाश केला. पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (guwahati police seized drugs including yaba tablets and heroin worth more than rs 14 crore from an ambulance)

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री एका रुग्णवाहिकेतून 50,000 याबा गोळ्या आणि 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 200 ग्रॅम हेरॉइनसह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटचा पदार्फाश करण्यात व्यस्त असल्याचे समजते.

- Advertisement -

याआधी, आसामच्या कछार जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे 50 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. कछारचे पोलीस अधीक्षक नुमल महत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री ऐझॉलहून सिलचरकडे येणाऱ्या दोन कार अडवल्या. दोन्ही कारमधून दोन लाख याबा गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

म्यानमारमधून मिझोराममार्गे या अमली पदार्थाची तस्करी होत होती. त्याची बाजारातील किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे. याप्रकरमी 5 जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी ही मोठी आंतरराज्य टोळी असल्याचे सांगितले होते. त्याशिवाय, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -