घरदेश-विदेशGyanvapi Mosque : हिंदूंच्या दाव्यावर होणार सुनावणी; मुस्लीम संघटनांची मागणी फेटाळली

Gyanvapi Mosque : हिंदूंच्या दाव्यावर होणार सुनावणी; मुस्लीम संघटनांची मागणी फेटाळली

Subscribe

 

अलाहाबादः Gyanvapi Mosque मध्ये पुजा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या हिंदू संघटनेच्या दाव्यावर सुनावणी होऊ शकते, असा निकाल The Allahabad High Court ने बुधवारी दिला. या दाव्याला विरोध करणारी मुस्लीम संघटनांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

- Advertisement -

Gyanvapi Mosque मध्ये हिंदू मंदिर आहे. तेथे पुजेला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा दावा हिंदू संघटनांनी तेथील जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्याला मुस्लीम संघटनांनी विरोध केला. या दाव्यावर सुनावणी होऊ शकत नाही, असे मुस्लीम संघटनांचे म्हणणे होते. जिल्हा न्यायाधीश डॉ. ए. के. विश्वेषा यांनी मुस्लीम संघटनांची मागणी फेटाळून लावली.

हिंदू संघटनांच्या दाव्यावर सुनवणी करताना नगर दिवाणी न्यायालयाने Gyanvapi Mosque चे चित्रिकरण आणि सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार Gyanvapi Mosque चे चित्रिकरण आणि सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवालही न्यायालयात सादर झाला.

- Advertisement -

त्यानंतर मुस्लीम संघटनांनी न्यायालयात दावा दाखल केला. सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याचा दाखला मुस्लीम संघटनांनी दिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जी धार्मिक स्थळे अस्तित्त्वात आहेत, त्यांना या कायद्यानुसार संरक्षण देण्यात आले आहे. अशा धार्मिक स्थळांबाबत काही दावे असतील तर त्यावर न्यायालयाने सुनावणी घेऊ नये, असा हा कायदा सांगतो. त्यामुळे हिंदू संघटनांच्या दाव्यावर सुनावणी घेऊ नये, असे मुस्लीम संघटनांचे म्हणणे होते.

मात्र Gyanvapi Mosque चे मंदिरात रुपांतर करावे, असे आमचे म्हणणे नाही. केवळ आम्हाला तेथे पुजेसाठी परवानगी हवी, असे हिंदू संघटनांनी न्यायालयाला सांगितले. नगर दिवाणी न्यायालयाने हिंदू संघटनांचे म्हणणे ग्राह्य धरत मुस्लीम संघटनांची मागणी फेटाळून लावली. त्याविरोधात मुस्लीम संघटनांनी The Allahabad High Court मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर सुनाणी घेऊन न्यायालयाने २४ डिसेंबर २०२२ रोजी याचा निकाल राखून ठेवला होता.

 

Gyanvapi Mosque मध्ये शेषनागासारखी कलाकृती

सर्वेक्षण अहवालानुसार, (Gyanvapi Mosque survey) या वास्तूच्या उत्तर ते पश्चिमेच्या बाजूने चालत गेल्यात मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसली, तसेत त्या ठिकाणच्या अवशेषांनुसार, एखाद्या मोठ्या भवनाचे अवशेषही दिसून आले.

तळमजल्यात स्वयंभू शिवलिंगाची मूर्ती; महतांचा दावा

वाळूखानाच्या तळमजल्यावर शिवलिंग असल्याचा दावा काशी विश्वनाथ मंदिराचे महंत कुलगुरूंनी केला आहे. तळमजल्यावर विश्वेश्वर महादेव मंदिर आहे. काशी विश्वनाथ धाम संकुलातील नंदीच्या मुखासमोरील दरवाजा उघडून बाबा विश्वेश्वर महादेवाची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही कुलगुरू तिवारी यांनी केली आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या महंत कुलगुरूंनीही त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ काही जुने फोटो दाखवले. ते म्हणाले की, वाळूखाना येथील तळमजल्यावर असलेल्या बाबा विश्वेश्वरांच्या शिवलिंगाची पूजा करण्यास परवानगी द्यावी, अशी माझी न्यायालयाला विनंती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -