घरताज्या घडामोडीमुस्लिम पक्षाला सर्वोच्च धक्का; ज्ञानवापीमध्ये पूजा अर्चना जैसे थे ठेवण्याचे सरन्यायधीशांचे आदेश

मुस्लिम पक्षाला सर्वोच्च धक्का; ज्ञानवापीमध्ये पूजा अर्चना जैसे थे ठेवण्याचे सरन्यायधीशांचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुस्लिम पक्षाला धक्का देणारा निकाल दिला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंचे धार्मिक विधी आणि पूजा, अर्चना सुरु ठेवण्याच्या वाराणसी आणि अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ज्ञानवापी मशिद समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि जस्टिस जे.बी. पारदीवाला, जस्टिस मनोज मिश्रा यांच्या पीठाने हे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, 17 आणि 31 जानेवारी रोजी व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगीच्या आदेशानंतर मुस्लिम समाजाकडून मशिदीत कुठल्याही अडचणीशिवाय नमाज अदा केली जात आहे. हिंदू पुजाऱ्यांकडून पूजा केली जात आहे. तळघर परिसरात जैसे थे स्थिती ठेवणे योग्य आहे जेणेकरून दोन्ही समुदाय निश्चित करण्यात आलेल्या अटींनुसार पूजा करू शकतील.

- Advertisement -

या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी करत मशिद समितीची याचिका फेटाळून लावली होती. यामध्ये हिंदु पक्षाला पूजा करण्याचा अधिकार देणारा वाराणसी जिल्हा कोर्टाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. अलाहाबाद उच्च न्यायलयाच्या या निर्णयानंतर देखील मुस्लिम पक्षाला झटका बसला होता आणि त्यानंतर मशिद समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात श्रृंगार गौरीची पूजा होत होती. 1991 च्या प्रार्थनास्थळ अधिनियमानंतर राज्य सरकारने ही पूजा बंद केली होती. मात्र हिंदु पक्षाने दावा केला होता की ज्ञानवापी मशिद हिंदु मंदिर पाडून करण्यात आले आहे. त्यामुळे पूजेची परवानगी मिळाली पाहिजे, अशी मागणी होती. ती सुरुवातीला वाराणसी जिल्हा न्यायालय आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालायने मान्य केली.

- Advertisement -

हेही वाचा : NIA : आरोपीला मौन राहण्याचा मूलभूत अधिकार, कोठडीत वाढ करण्यास तेलंगणा हायकोर्टाचा नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -