घरदेश-विदेश...म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री ढसाढसा रडले

…म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री ढसाढसा रडले

Subscribe

युती सरकारचे विष पचवावे लागत आहे. असे सांगत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळूरूतील एका कार्यक्रमामध्ये रडले.शिवाय युती सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींचा देखील त्यांनी पाढा वाचून दाखवला.

कोणा एका राज्याचा मुख्यमंत्री किंवा राजकीय नेता तुम्ही उघडपणे ढसाढसा पडताना पाहिलाय का? पण अशीच रडण्याची वेळ कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर आली. कर्नाटकमध्ये युती सरकार चालवताना किती अडचणी येत आहेत हे सांगताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना अश्रु अनावर झाले. यावेळी त्यांनी युती सरकारचे विष पचवावा लागत आहे असे म्हणत अश्रुंना मोकळी वाट करून दिली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याबद्दल बंगळूरमध्ये कुमारस्वामी यांच्या सन्मानासाठी शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमारस्वामी यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

काय म्हणाले कुमारस्वामी?

माझ्या पक्षातील लोक आनंदी आहेत. कारण त्यांचा अण्णा  ( मोठा भाऊ ) मुख्यमंत्री झाला आहे. मात्र सद्यस्थितीमुळे मी अजिबात खुश नाही आहे. कुणालाही न सांगता स्वत:चे दु:ख लपवावे लागत असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. यावेळी सरकार चालवताना येणाऱ्या अडचणी सांगत कुमारस्वामी भावूक झाले आणि त्यांनी युती सरकारचे विष पचवावे लागत आहे असे म्हणत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ज्या सरकारला स्पष्ट जनादेश नाही, त्या सरकारचे नेतृत्व करण्यात मला आनंद नाही. गेल्या माहिन्यापासून शेतकरी कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांकडे किती विनंती केली. शिवाय अजून काय – काय करावे लागले हे मलाच माहित. आता अन्नभाग्य योजनेतंर्गत ५ किलोच्या जागी ७ किलो तांदुळ द्यायचे आहे. त्यासाठी २५०० कोटी रूपये कुठू आणू? अशा शब्दांमध्ये कुमारस्वामी यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

- Advertisement -

मुख्यमंत्री बनण्यामागे माझा स्वार्थ नव्हता. केवळ जनतेच्या सेवेसाठी मी मुख्यमंत्री झालो. मदतानाच्या वेळी जनता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला विसरली असे म्हणत त्यांनी जनतेवर देखील आपला रोष व्यक्त केला. १०४ जागा जिंकत भाजप कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरला. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने येडियुरप्पांना केवळ दोन दिवसातच राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत सरकार स्थापन केले. दोन्ही पक्षांचे मिळून सध्या ११६ आमदार आहेत. यामध्ये काँग्रेसचे ७८ आमदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -