घरटेक-वेकDomino's Pizza इंडियावर हॅकर्सचा हल्ला, १० लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स केले हॅक

Domino’s Pizza इंडियावर हॅकर्सचा हल्ला, १० लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स केले हॅक

Subscribe

हॅकर्सने हॅकने केलेल्या डेटाची साइज जवळपास १३ TB इतकी आहे.

भारतीय कंपन्यांवर सायबर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सायबर क्राईमच्या हल्ल्यात प्रसिद्ध अशा Domino’s Pizza इंडिया कंपनीचे नाव पुढे आले आहे. Domino’s Pizza इंडियावर हॅकर्सने सायबर हल्ला करुन १० लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स हॅक केले आहेत. Domino’s Pizzaवर ऑनलाईन शॉपिंग केलेल्या लोकांचा पर्सनल डेटा लीक करण्यात आला आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सने १० लोकांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स डार्क वेबवर ४ करोड रुपयांना विकण्यात आले आहे. हॅकर्सने हॅकने केलेल्या डेटाची साइज जवळपास १३ TB इतकी आहे.

Alon Galने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हणले आहे की, Domino’s Pizza इंडियाच्या १८०,०००.००० लाख युझर्सचे फोन नंबर, ईमेल एड्रेस, पेमेंट डिटेल्स आणि १० लाख क्रेडिक कार्डचा समावेश आहे. Alon Galच्या ट्विटवर अद्याप Domino’s Pizza इंडियाने कोणतेही उत्तर दिलेले नाही.Domino’s Pizza इंडियाचा हा हॅक केलेला डेटा हॅकर्स ४ करोड रुपयांना विकण्याच्या प्लॅनमध्ये आहेत. या डेटाबेससाठी एक सर्च पोर्टल तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

इंडिपेंडेंट साइबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी IANS ला सांगितल्यानुसार, राजशेखर यांनी याआधी या गोष्टीची कल्पना दिली होती. त्याचप्रमाणे CERT- in या एजेंसीला ५ मार्च रोजी याविषयी सांगितले देखिल होते. हॅकर्सकडे २०० मिलियन लोकांचे पर्सनल आणि ऑर्डर डिटेल्स होते याबद्दलही त्यांनी आधीच सांगितले होते. याआधीही भारतातील BigBasket,BuyUnicon,JusPay,Upstox या कंपन्यांचा डेटाही लीक करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Flipkart वर स्मार्टफोन कार्निव्हल; Xiaomi, Realme वर मिळतेय जबरदस्त सूट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -