Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश एम्स रुग्णालयातील सर्व्हर हॅकिंगप्रकरणी मोठ खुलासा; हॅकर्सकडून 200 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीची मागणी

एम्स रुग्णालयातील सर्व्हर हॅकिंगप्रकरणी मोठ खुलासा; हॅकर्सकडून 200 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीची मागणी

Subscribe

दिल्ली एम्स या देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयातील सर्व्हर सहा दिवसांपूर्वी हॅक झाले, मात्र सहा दिवसांनंतरही हे सर्व्हर नीट काम करेनास झालं आहे. अशात या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. हॅकर्सनी दिल्ली एम्स रुग्णालयातील सर्व्हर हॅक करत 200 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीची मागणी केली. दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून हे सर्व्हर नीट झाले नाही. यामुळे रुग्णालयातील इर्मजन्सी ओपीडी आणि इतर लॅब सेवा सर्व मॅन्युअली पुरवल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वी एम्सचा सर्व्हर हॅक झाला होता. त्यानंतर अनेक तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असला तरी अद्याप या प्रकरणात कोणालाच यश मिळालेले नाही. सर्व तपास यंत्रणांना सर्व्हर हॅक झाल्याचा मेसेज परदेशातून येत होता. त्याचवेळी हॅकर्सनी 200 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीची मागणी केली, हॅकर्सनी पैशांसाठी रुग्णालयाचा सर्व्हर हॅक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

23 नोव्हेंबर रोजी एम्सच्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला झाला होता. त्यामुळे एम्स ई-हॉस्पिटलचा सर्व्हर आणि एलआयएसचा (लॅबोरेटरी इन्फॉर्मेशन सिस्टम) सर्व्हर खराब झाला. याशिवाय दोघांच्या बॅकअप सर्व्हरमध्येही बिघाड झाला होता. यामुळे 23 नोव्हेंबरपासून एम्सची डिजिटल सेवा ठप्प झाली आहे.

NIC (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर), इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) आणि CDAC (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) च्या टीम्स AIIMS सर्व्हर दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत. एम्समध्ये असलेल्या सर्व पाच हजार कॉम्प्युटर्सचे स्कॅनिंग केले जाणार आहे. या कामाला काही दिवस लागतील. यामुळे टप्प्याटप्प्याने तात्पुरत्या सर्व्हरवरून डिजिटल सेवा सुरू करण्याची योजना होती. डिजिटल सेवा सुरू होण्यास एक-दोन दिवस लागू शकतात, असे सांगण्यात येत आहे. सध्या एम्स प्रशासन यावर काहीही बोलायला तयार नाही.


महिला सुरक्षा हाच शिंदे-फडणवीस सरकारचा अजेंडा : चित्रा वाघ

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -